आरोग्यसेवेतून समाजसेवेचा नवा आदर्श.....
चोरडिया हॉस्पिटलचा पुढाकार...
वणी : सुरज चाटे
समाजाच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणारे पोलिस कर्मचारी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने चोरडिया हॉस्पिटलने स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर हा अत्यंत स्तुत्य आणि समाजोपयोगी उपक्रम ठरत आहे.
या उपक्रमाबद्दल शहरातील विविध स्तरातून चोरडिया हॉस्पिटलचे अभिनंदन करण्यात येत असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या पुढाकाराचे कौतुक होत आहे.
सामान्य नागरिकांच्या आरोग्यसेवेसोबतच समाजासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिस बांधवांच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारण्याचा चोरडिया हॉस्पिटलचा हा प्रयत्न प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
नियमित आरोग्य तपासणीमुळे अनेक गंभीर आजारांचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार शक्य होतात. त्यामुळे अशा शिबिरांचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. या शिबिरात ईसीजी, छातीचा एक्स-रे, सीबीसी, लिपिड प्रोफाइल, HbA1c, एफबीएस, सीरम क्रिएटिनिन तसेच थायरॉईड फंक्शन टेस्टसह विविध महत्त्वाच्या तपासण्या आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे पोलिस कर्मचारी व प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या आरोग्याविषयी योग्य सल्ला मिळणार आहे.
समाजाप्रती असलेली संवेदनशीलता आणि आरोग्यसेवेची निस्वार्थ भावना जपणाऱ्या डॉ. रोहित डी. चोरडिया व चोरडिया हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे विविध सामाजिक, प्रशासकीय व नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, भविष्यातही असे सेवाभावी उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







0 Comments