ADvt

बस–ट्रकची भीषण आमनेसामने धडक



ब्रेकिंग न्यूज — मोठी दुर्घटना!

वणी—यवतमाळ मार्गावर जळका फाट्याजवळ बस–ट्रकची भीषण आमनेसामने धडक

वणी :- सुरज चाटे 

        दि. ०४ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास वणी—यवतमाळ मार्गावर जळका फाट्याजवळ मोठी दुर्घटना घडली. वणीवरून यवतमाळकडे जाणारी एस.टी.ची लालपरी बस आणि करंजी वरून वणीच्या दिशेने येणारा ट्रक यांची जोरदार आमनेसामने धडक झाली.
     धडक इतकी भीषण होती की बस व ट्रकचा पुढील भाग चक्काचूर झाला. काही प्रवासी गंभीर जखमी असून ४ ते ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली असून पोलिसांनी बचाव कार्याला वेग दिला आहे.
     घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण असून अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे

Post a Comment

0 Comments