महासंग्राम मोर्चाच्या तयारीला वेग...
सतीश पाटील देरकर यांच्या निवासस्थानी पार पाडली महत्वपूर्ण बैठक...
वणी :- सुरज चाटे
दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी रविवारच्या दिवशी सतीश भाऊ देरकर यांच्या घरी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आगामी महासंग्राम मोर्चा तसेच शेतकरी महासभा आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा पार पडली.
या चर्चासत्रात शेतकरी संघटनेचे देवराव धांडे, अनिल भाऊ गोवारदिपे, प्रहार संघटनेचे मोबिनभाई शेख तसेच रघुवीर कारेकर उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा करत आगामी सभेचे स्वरूप, मुद्दे आणि नियोजन यावर सर्वांनी विचारमंथन केले.
दरम्यान, वणी येथे पार पडलेल्या मोठ्या शेतकरी महासभेला नेत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. या सभेला माजी मंत्री बच्चु कडू, शेतकरी नेते वामनराव चटप, डॉ. अजित नवले, राजू शेळी, रविकांत तुपकर, महादेव जानकर, रघुनाथदादा पाटील, विजय जवंधीया यांसह इतर सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी मोर्चासाठी स्थानिक पातळीवर नेतृत्व उभारणी व संघटन बांधणी संदर्भात पुढील महत्त्वाची बैठक दि. १० रोजी, बुधवार रेस्ट हाऊस वणी येथे आयोजित करण्यात आली असून सर्व संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या हक्क आणि न्यायासाठीचे हे निर्णायक पाऊल ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.









0 Comments