ADvt

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत २०० रक्तपिशव्यांचे लक्ष्य



मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त वणीत २०० रक्तपिशव्यांचे लक्ष्य; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.....

२२ जुलै रोजी बाजोरिया हॉलमध्ये सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिबिर; प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू, नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन....

सत्यभाषा वणी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, वणी शहर यांच्या वतीने बुधवार, २२ जुलै २०२६ रोजी बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी येथे सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाप्रती असलेली बांधिलकी जपत गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या सामाजिक भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात यंदा २०० रक्तपिशव्या संकलित करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
     रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. याच भावनेतून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी तसेच शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या सामाजिक उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच प्रत्येक रक्तदात्याने आपल्या मित्रपरिवार, नातेवाईक व इच्छुक नागरिकांनाही रक्तदानासाठी सोबत आणावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
      रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा आकर्षक भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार असून, या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन भाजप वणी शहरतर्फे करण्यात आले आहे.

शिबिराची माहिती

स्थळ : बाजोरिया हॉल, वरोरा रोड, वणी

दिनांक : बुधवार, २२ जुलै २०२६

वेळ : सकाळी ९.०० ते दुपारी ३.००

आयोजक : भारतीय जनता पार्टी, वणी शहर


संपर्क

संयोजक : श्री. बालाजी भेदोडकर (युवा मोर्चा अध्यक्ष) – ९७३८३४१६१६

सहसंयोजक : श्री. विलास डवरे (शहर उपाध्यक्ष) – ९४०४५२६७६९

सहसंयोजक : श्रीमती वैशाली वातिले (नगरसेविका) – ९४२१८५१७२५

सहसंयोजक : सौ. भारती बदखल (शहर उपाध्यक्ष) – ८३२९११६७०५

     या रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन भाजप वणी शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी केले आहे.

Post a Comment

0 Comments