ADvt

वांजरी चुनखडी आणि डोलोमाईट खान सहा उत्कृष्ठ पुरस्काराने सन्मानित...



नागपुर विभागाकडुन फैझल व सुमेर खान यांनी स्विकारला सन्मान...

वणी :- सुरज चाटे

     मेटॅलिफेरस समिती नागपुर विभागाकडून सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान त्या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते अनेक खान क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान सुद्धा करण्यात आला. दरम्यान वांजरी चुनखडी आणि डोलोमाईट खान सहा उत्कृष्ठ पुरस्काराने सन्मानित झाली असुन नागपुर विभागाकडुन फैझल व सुमेर खान यांनी हा सन्मान दि 30 ला मुकुटबन येथे झालेल्या कार्यक्रमात स्विकारला आहे. 
     Metalliferous Committee Nagpur Division organized a safety week. Meanwhile, various dignitaries honored the outstanding performers in various mining sectors. Meanwhile, Wanjari Limestone and Dolomite Mines were honored with six excellence awards and Faisal and Sumer Khan from Nagpur Division accepted the award on the 30th.
    मोठ्या प्रमाणात असलेल्या विविध खाणीत सुरक्षा संदर्भातील महत्व व विविध सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यात फैमिदा परवीन बशीरुद्दीन खान, चुनखडी आणि डोलोमाइट खाण वांजरी यांचा 42 व्या मेटलिफेरस माइन्स सेफ्टी वीक सेलिब्रेशन 2024 मध्ये सहा उत्कृष्ठ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यात  गट ब एकूण श्रेणी - प्रथम पारितोषिक, खाणी योजना आणि रेकॉर्ड - प्रथम पारितोषिक, माझे काम प्रथम पारितोषिक, साठवण, वाहतूक आणि वापर - द्वितीय पारितोषिक, व्यवसायिक आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण सुविधा - द्वितीय पारितोषिक तर व्यावसायिक प्रशिक्षण आणि प्रथमोपचार- तृतीय पारितोषिक, एकूणच सहा उत्कृष्ठ पारितोषिक प्राप्त झाले आहे. 
     सदर सन्मान फैझल बशीर खान व सुमेर बशीर खान यांनी स्विकारला दरम्यान त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments