ADvt

दैनिक वसुली एजंट ला लुटलेवणी :- सुरज चाटे

वणी येथील बरेच वर्षांपासून दैनिक पिग्मी एजंट चे काम करीत असलेले सुनील ठाकरे वसुली करीत असताना त्यांना अज्ञात चोरट्यानी लुटल्याची घटना दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 10.15 च्या दरम्यान घडली.
दिनांक ३ जानेवारी 2023 ला रात्री सव्वा दहा वाजता पिग्मी एजंट श्री सुनिल ठाकरे, श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या, वणी (वणी शहर शाखा) यांना तिन अज्ञात व्यक्तींनी दुचाकी ला धक्का देऊन खाली पाडले व त्यांची वसुलीची बॅग हिसकावली व बॅग घेऊन तिघेही पळून गेले. बॅग मध्ये वसूली रक्कम रू.२५०००/- व मोबाइल होता. ही घटना सत्यसेवा हॉस्पिटल जवळ रात्री १०:१५ वाजता घडली. सुदैवाने सुनील ठाकरे यांना कोणतीही इजा झाली नाही, पोलीस स्टेशन वणी येथे सुनील ठाकरे यांनी तक्रार दाखल केली आहे, पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments