ADvt

सावत्र मुलास ठार मारून विहिरीत फेकलेमद्यपी बापाचे कृत्य :- यवतमाळ जिल्यात एकच खळबळ, निर्दयी बापाला अटक..

यवतमाळ :सत्यभाषा न्युज

     दारूच्या नशेत सात वर्षीय सावत्र मुलास ठार मारून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना बाभूळगाव तालुक्यातील दाभा (पहूर) येथे रविवारी दुपारी घडली. याप्रकरणी मारेकरी बापाला बाभूळगाव पोलिसांनी रात्री अटक केली.

देविदास उर्फ देऊ नामदेव कोडापे (३६), असे आरोपीचे नाव आहे. त्याने दुसऱ्या पत्नीचा मुलगा राहुल याला ठार मारले.

आरोपी देविदास उर्फ देऊ नामदेव कोडापे हा यवतमाळ येथे तलावफैल भागात राहात होता. सोबत दुसऱ्या पत्नीचा मुलगा राहुलही राहायचा. रविवारी देविदासचा दारूच्या नशेत पत्नीसोबत वाद झाला. तेथून तो राहुलला घेऊन दाभा येथे असलेल्या घरी गेला. तेथे त्याने राहुल याला काठीने जबर मारहाण केली. गावकऱ्यांनी हा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. यानंतर देविदासने राहुल याला हात पकडून गावाबाहेर नेले.

देविदास एकटाच गावात परतल्याने गावकऱ्यांना संशय आला. विचारणा करूनही त्याने राहुलविषयी काहीही सांगितले नाही. त्यांनी शोधाशोध सुरू केली. या प्रकाराची माहिती बाभूळगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस तात्काळ दाभा (पहूर) येथे पोहोचले. त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने राहुलचा शोध सुरू केला. त्यावेळी त्याचा मृतदेह ठाकरे यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. याप्रकरणी देऊ कोडापे या निर्दयी बापाला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक रवींद्र जेधे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे करीत आहे.

Post a Comment

0 Comments