ADvt

बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्यावणी/मारेगाव :- सुरज चाटे
       कॉलेजमध्ये शिकत असलेल्या एका कुमारीकेने गळफास   घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील हिवरा (मजरा) येथे घडली आहे.  कु प्रांजली राजू बोढे, वय अं 18  असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती एका जुनिअर कॉलेजमध्ये 12 ला शिक्षण घेत आहे.
         मारेगाव तालुक्यातील, हिवरा ( मजरा )येथील 18 वर्षीय युवती आपल्या कुटुंबियांसोबत आनंदात राहात होती. दि. 2 जानेवारीला आपल्या कुटुंबियांसोबत शेतामध्ये गेली होती. दुपारी दोनच्या दरम्यान ती बैल पाणी पाजून आणतो म्हणून आईवडिलांपासून दुसऱ्या शेतामध्ये गेली. त्या शेतामध्ये  साहित्य ठेवण्यासाठी छोटासा कोठा आहे. तेथेच या मुलीने बैल बांधण्याच्या दोराने गळफास घेतला.
    मुलगी परत आली नाही म्हणून  जाऊन शोधा शोध केली असता ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments