ADvt



वणी:- सुरज चाटे

    वणी वरोरा रोडवरील नायगाव जवळ कार व दुचाकीची धडक होऊन दोन तरुण ठार झाल्याची घटना दिनांक २८ फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली. 
     वणी येथील तिन तरूण वरोरा येथे एका कार्यक्रमानिमित्य गेले होते. कार्यक्रम आटोपून वणी कडे दुचाकीने येत असताना नायगाव जवळ वणी कडून जाणारी कार व वरोऱ्याकडून वणी कडे येणाऱ्या दुचाकीत समोरा समोर धडक बसल्याने दुचाकीवरील आकाश गाउत्रे वय २८ वर्ष,  अमोल मडावी वय २९ वर्ष यांचा अपघातात मृत्यू झाला असून, तर रानु तुमराम, वय २७ वर्ष हा गंभीर जखमी झाला आहे. 
     वणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह व जखमीला वणी येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असुन पुढील तपास वणी पोलिस करीत आहे.

Post a Comment

0 Comments