ADvt

गोकुळ नगर येथे घराला व बंड्याला भिषण आग (FIRE)


गोकुळ नगर परिसरात लागलेली भीषण आग

वणी :- सुरज चाटे

वणीतील गोकुळ नगर परिसरातील एकाचे घर व एकाचा बंड्याला आग लागुन लाखोंचे नुकसान झाल्याची घटना दिनांक 28 फेब्रुवारी 2023 ला सायंकाळी 6.39 वाजताच्या दरम्यान घडली.

     वणी शहरातील गोकुळ नगर परिसरातील जानराव वाघडकर यांच्या मालकीचा कुटार ठेऊन असलेला बंडा व भीमराव आत्राम यांच्या मालकीचे असलेले घर अचानक लागलेल्या आगीत आले असून घरातील घरगुती वस्तू व जीवनावश्यक वस्तू जळाल्या असुन बंड्यातील कुटार तसेच बंड्यातील संपूर्ण लाकडी साहित्य जळले असून घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच अग्निशमन विभागाची चमू व वणी पोलीस विभाग घटनास्थळी दाखल झाले दरम्यान आगेवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
     
      आग नेमकी कशी लागली हे अजूनतरी स्पष्ट नसले तरी आगीत अंदाजे एक लाख अंशी हजार रुपया पर्यंत नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविल्याजात आहे.

Post a Comment

0 Comments