ADvt

वसंत जिनिंगमध्ये ‘ते’ दोन महारथी आमनेसामने..



वसंत जिनिंगमध्ये ‘ते’ दोन महारथी आमनेसामने.. एक मेकांना पाहून घेण्याची भाषा...

रात्रीची चर्चा वणीत दिवसभर ; ते दोन महारथी कोण?

वणी :- सुरज चाटे 

     वणी येथील शेतकऱ्यांसाठी ओळख असलेली वसंत जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी लिमिटेड दि. २९ डिसेंबरच्या रात्री अचानक चर्चेच्या भोवऱ्यात सापडली. कारणही तसंच… जिनिंग परिसरात दोन ‘महारथी’ आमनेसामने येताच वातावरण तापलं आणि पाहता पाहता चांगलाच राडा झाल्याची चर्चा वणीत रंगू लागली आहे.
     नेमकं काय घडलं, कुठल्या कारणावरून वाद पेटला, हे केवळ तिथे उपस्थित असलेल्यांनाच ठाऊक असल्याचं सांगितलं जात असलं तरी, दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली हे मात्र निश्चित. प्रसंग हाताबाहेर जात असल्याचं लक्षात येताच उपस्थितांनी मध्यस्थी करत प्रकरण आवरलं, अशी माहिती पुढे येत आहे.
     विशेष म्हणजे, या वादातील दोघेही दिग्गज आणि वजनदार व्यक्तिमत्त्वे असल्याची चर्चा आहे. त्यातच एक महारथी थेट एका आमदाराचा अत्यंत निकटवर्तीय असल्याचं बोललं जात असल्याने, प्रकरणाला अधिकच राजकीय रंग चढत आहे. मात्र ते दोन महारथी नेमके कोण? हा प्रश्न वणीकरांच्या ओठावर कायम असून, नावं उघड न झाल्याने रहस्य अधिकच गडद बनलं आहे.
     दरम्यान, या राड्यात मारहाण झाली की नाही?, याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र ‘एकमेकांना पाहून घेण्याची’ भाषा नक्कीच झाली, अशी खमंग चर्चा शहरभर पसरली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेला वसंत जिनिंग परिसर दारुड्यांचा अड्डा तर बनत नाही ना? असा सवालही आता उघडपणे उपस्थित केला जात आहे.
     रात्रीच्या या घटनेची चर्चा दिवसभर वणीत गाजत असून, या प्रकरणाचा पुढे नवा खुलासा होतो की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments