ADvt

माय–बाप जनता… आलाय तुमचा लाल...



माय–बाप जनता… आलाय तुमचा लाल...

प्रभाग ११ मध्ये भाजपचे लवलेश लाल विजयी होताच...लागले कामाला.... 

विविध अनुभव घेऊन पालिकेत वजनदार एन्ट्री...

वणी :- सुरज चाटे 

      वणी नगर परिषद निवडणुकीत भाजपला जनतेने स्पष्ट कौल दिला असून नगराध्यक्षांसह बहुसंख्य जागांवर भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधून भाजपचे उमेदवार लवलेश किशनलाल लाल यांनी शिवसेनेचे उमेदवार शेख मोहम्मद अल्ताफ रहीम यांचा २६२ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.


     निवडून येताच विकासकामांकडे लक्ष, विजयानंतर लगेचच नगरसेवक लवलेश लाल यांनी प्रभागातील मूलभूत नागरी समस्यांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार ट्यूबवेल, बंद असलेले पथदिवे सुरू करणे, तसेच इतर दैनंदिन सुविधांबाबत पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रभागात सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे.


     अनुभवाचा पालिकेला फायदा, लवलेश लाल हे रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी, वणीचे अध्यक्ष, व्यापारी असोसिएशनचे कोषाध्यक्ष तसेच भाजपा व्यापारी आघाडी यवतमाळ जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत. सामाजिक व व्यापारी क्षेत्रातील त्यांच्या अनुभवामुळे नगर परिषदेत त्यांची ‘वजनदार’ एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
     उपाध्यक्षपदाच्या चर्चेला उधाण, भाजपला मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे आता पालिकेतील सत्ता वाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. त्यातच लवलेश लाल यांचे संघटनात्मक कौशल्य आणि प्रशासकीय अनुभव पाहता त्यांची नगरपालिका उपाध्यक्ष किंवा एखाद्या महत्त्वाच्या सभापतीपदावर निवड होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

विश्वासाचे सोने करण्याचा निर्धार
     “जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी प्रभागाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाईल,” अशी भूमिका लवलेश लाल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभाग ११ मध्ये ‘आलाय तुमचा लाल’ ही घोषणा आता विकासाच्या अपेक्षांशी जोडली जात असल्याचे चित्र आहे.

Post a Comment

0 Comments