थंडीत कंबल, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य; सामाजिक बांधिलकीतून पूर्वेश भैया सरनाईक यांचा वाढदिवस साजरा...
युवासेनेचा उपक्रमशील संदेश – साधेपणा, सेवाभाव आणि समाजासाठी समर्पण
वणी :- सुरज चाटे
युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश भैया सरनाईक साहेब यांचा वाढदिवस दिखाव्या ऐवजी सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला. वाढती थंडी लक्षात घेऊन मध्यरात्री रस्त्याच्या कडेला थडथडणाऱ्या गोरगरीब नागरिकांना कंबल वाटप करून मायेची उब देण्यात आली. या उपक्रमामुळे गरजूंना आधार मिळाला असून मानवी संवेदनशीलतेचे दर्शन घडले.
यासोबतच राजश्री शाहू महाराज हिंदी विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक अभय पारखी, प्रायव्हेट आयटीआयचे प्राचार्य तेलतुंबडे सर, कुणाल लोणारे, सौरभ खडसे तसेच समस्त युवा सैनिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा या उपक्रमाचा खरा गौरव ठरला.
तसेच रामदेवबाबा अपंग विद्यालय, चिखलगाव येथे ग्रीन बोर्ड व विविध खेळांच्या साहित्याचे वाटप करून अपंग विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक विकासाला चालना देण्यात आली.
या सर्व समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन युवासेना चंद्रपूर लोकसभा अध्यक्ष विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केले. आपल्या भाषणात विक्रांत चचडा यांनी सांगितले की, “पूर्वेश भैया सरनाईक हे आमच्यासाठी प्रेरणास्थान असून, अशा आदर्श व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस कोणताही आगाऊ खर्च न करता साधेपणाने आणि समाजहिताच्या दृष्टीनेच साजरा व्हावा, हाच आमचा संकल्प आहे.”
सेवा, संवेदना आणि साधेपणाचा आदर्श जपत साजरा झालेला हा वाढदिवस युवकांसाठी प्रेरणादायी ठरला असून समाजात सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.












0 Comments