ADvt

वणीत ‘महाएल्गार’ शेतकरी मेळावा...



वणीत ‘महाएल्गार’ शेतकरी मेळावा; दिग्गज शेतकरी नेते एकाच व्यासपीठावर...

बच्चू कडू, राजू शेट्टी, प्रकाश पोहरे, अजित नवले, रवीकांत तुपकरांसह मान्यवरांची उपस्थिती... शेतकरी प्रश्नांवर एल्गार पुकारणार...

वणी :- सुरज चाटे

 वणी शहरात दि. ४ जानेवारी २०२६ ला दुपारी १२ वाजता वणी येथील शासकीय मैदान येथे भव्य शेतकरी महाएल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यामुळे शेतकरी चळवळीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शेतकरी, कष्टकरी आणि ग्रामीण जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर थेट भूमिका मांडत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे.
     या मेळाव्याला माजी मंत्री बच्चू कडू, शेतकरी नेते वामनराव चटप, प्रकाश पोहरे, डॉ. अजित नवले, राजू भाऊ शेट्टी, रवीकांत तुपकर, महादेव जानकर, रघुनाथ दादा पाटील, राजन क्षिरसागर, अनिल घनवट, यांच्यासह विविध सामाजिक व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने वणी शासकीय मैदान येथे उपस्थित राहणार आहेत. शेतमालाला योग्य दर, कर्जमाफी, वीज-पाणी प्रश्न, पीक विमा, तसेच शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न यावर ठोस आवाज उठवण्यात येणार आहे.
     या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे सतीश देरकर, अनिल घाटे, देवराव धांडे, दशरथ पाटील बोबडे, अनिल भाऊ गोवारदिपे, प्रहार संघटनेचे मोबिनभाई शेख तसेच रघुवीर कारेकर यांनी केले आहे. वणी व परिसरातील शेतकरी बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांनी या ऐतिहासिक महाएल्गार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments