वणी येथे 79 वा होमगार्ड वर्धापन दिन उत्साहात साजरा....
शहरातून पथसंचलन, श्रमदान व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता...
वणी :- सुरज चाटे
वणी येथील होमगार्ड विभागाच्या वतीने 79 वा होमगार्ड वर्धापन दिन रविवार (दि. 28 डिसेंबर 2025) रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वणी शहरातील शिवाजी चौक, अणे चौक, गांधी चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक व टिळक चौक या प्रमुख मार्गांवरून पथसंचलन काढण्यात आले. पथसंचलनादरम्यान थोर पुरुषांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले तसेच होमगार्ड वर्धापन दिनाच्या घोषणा देण्यात आल्या.
यानंतर शासकीय मैदान व पोलीस स्टेशन परिसरात श्रमदान करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अशोक रमेश थोरात यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हा होमगार्ड प्रशिक्षण केंद्राचे केंद्रनायक राजेंद्र बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी वणी तालुका समादेशक अधिकारी देवराव बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमास पलटन नायक अधिकारी मंगेश पिंपळकर, विशाल बोरकुटवार, उमेश आवारी, प्रविण पिंपळकर, विवेक चांदेकर यांच्यासह मोठ्या संख्येने पुरुष व महिला होमगार्ड जवान उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद मुन व विलास जिवतोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तालुका समादेशक अधिकारी देवराव बिडकर यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने होमगार्ड वर्धापन दिन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.








0 Comments