आंतरराज्यीय गुटखा तस्करीवर यवतमाळ पोलिसांचा घाव...
दोन इसम ताब्यात; ६५ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त...
वणी : - सुरज चाटे
जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध गुटखा तस्करीला आळा घालण्यासाठी यवतमाळ पोलिसांनी मोठी कारवाई करत आंतरराज्यीय तस्करीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन इसमांना ताब्यात घेत तब्बल ६५ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिनांक २७ डिसेंबर रोजी पांढरकवडा-वणी मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर सापळा रचला. यादरम्यान आयशर वाहन क्रमांक UP-94-AT-2305 अडवून झडती घेतली असता, त्यात महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित पान मसाला व तंबाखू आढळून आला.
या प्रकरणी मोहन सियाराम यादव (२६), व्यवसाय चालक, रा. पिंडोठा, जि. शिवपुरी (मध्यप्रदेश) व बुद्धा बाबूसिंग परिहार (३५), व्यवसाय मजूर, रा. अमोला, जि. शिवपुरी (मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान सुगंधित पान मसाला व एस आर 1 सेंटेड तंबाखू असा सुमारे ४५.९२ लाखांचा माल, आयशर वाहन (किंमत अंदाजे २० लाख रुपये) व मोबाईल फोन (किंमत अंदाजे ६ हजार रुपये) असा एकूण ६५.९८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कारवाई ही मा, पोलीस अधिक्षक श्री, कुमार चिंता, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात, यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पो. नि. सतिष चवरे स्था. गु.शा. यवतमाळ, सपोनि दत्ता पेंडकर, पोउपनि. धनराज हाके, पोउपनि. गजानन राजामलु, पोहवा / सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, पोशि. सलमान शेख, चापोहवा नरेश राउत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वररित्या पार पाडली. पुढील तपास पोलीस स्टेशन पांढरकवडा करीत आहे.








0 Comments