ADvt

वणीला रंगणार महामूर्ख संमेलन



वणी :- राजु गव्हाणे

     गेली पन्नास वर्षे सांस्कृतिक परंपरा जपणारे आणि सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. राम शेवाळकर यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेले वणी येथील महामूर्ख संमेलन याहीवर्षी आयोजीत करण्यात आलेले आहे.

     दरवर्षी होणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवात हास्यरंगाची पेरणी करणारे हे संमेलन असते. यावर्षी सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता एजाज खान, नागपुर तसेच सुप्रसिद्ध कवी अनिल दिक्षित, पुणे हे या कार्यक्रमाचे खास आकर्षण राहणार आहे. वणीचे सुप्रसिद्ध नाटय व हास्य कलावंत प्राचार्य श्री. हेमंत चौधरी व वऱ्हाडी कवी श्री. पुरुषोत्तम गावंडे हे देखील प्रेक्षकांना मनमुराद हसविणार आहे. या संमेलनात आजतागायत अनेक नामवंत कलाकारांनी हास्यरंग उधळले आहे. यावर्षी सुद्धा हे संमेलन शेतकरी मंदिर, वणी येथे दिनांक ०७ मार्च २०२३ रोज मंगळवारला दुपारी २:०० वाजता संपन्न होणार आहे. या महामूर्ख संमेलनाला समस्त वणीकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. असे आव्हान आयोजक श्री. मुन्नालाल तुगनायक, शशिकांत माळीचकर, जयचंद खेरा, संजय खाडे, राजेश महाकुलकार, भुमारेडडी बोदकुरवार, विलन बोदाडकर, गजानन बोढे, सुनिल पानघाटे यांचे मार्फत करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments