ADvt

दारुड्या पित्याने मुलाची केली हत्या व स्वतः ही केला आत्म्यहत्येचा प्रयत्न

हृदयद्रावक घटना :- सुसाईड नोट लिहून एकाच सकुली वर नेण्याचे लिखान..

निर्दयी पित्याला अटक :- पत्नी लग्नसमारंभात गेल्याने दारुड्याने सख्या मुलाचा घेतला बळी...

चंद्रपुर :- मनिष रक्षमवार

    एका दारुड्या पित्याने आपल्या 3 वर्षीय मुलाचा झोपेतच गळा दाबून हत्या करून स्वतः ही चाकूने गळा आणी हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला. ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून आरोपी पित्यावर आक्रोश व्यक्त केल्या जात आहे.

     चंद्रपूर जिल्ह्यातील, मुल तालूक्या अंतर्गत येणाऱ्या राजोली या गावातील वार्ड क्र. 1 माना मोहल्ला येथील रहिवासी 32 वर्षीय गणेश चौधरी हा आपली पत्नी काजल आणी 3 वर्षीय मुलगा प्रियांशु यांचे सोबत राहत होता. गणेश ला दारूचे व्यसन असल्यामुळे त्याचे नेहमी पत्नी सोबत भांडण होत होते. 4-5 दिवसापूर्वी काजलच्या मोठ्या बहिणी कडे लग्न समारंभाकरिता जायला निघाली त्या वेळेस गणेश ने प्रियांश ला पत्नी सोबत जाऊ दिले नाही. काजल एकटीच धानोरा तालुक्यात आपल्या बहिणीकडे निघून गेली. काल रात्री 12 वाजताच्या सुमारास प्रियांश झोपेत असताना गणेश याने आपल्या मुलाची गळा दाबून निर्घून हत्या केली. सुसाईड नोट लिहून त्या नंतर स्वतः चाकूने गळ्याला आणी हाताची नसे कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परन्तु त्यात तो बचावला. सकाळी 7 वाजता च्या सुमारस या घटनेची माहिती शेजाऱ्यांना होताच त्यांनी गावातील पोलीस पाटील गोपाल ठिकरे यांना दिली. याची माहिती मुल पोलीस स्टेशन ला देण्यात आली. घटना स्थळावर तात्काळ पोलीस निरीक्षक सुमित परतेकी आपल्या पोलीस ताफ्यासह दाखल झाले. आरोपी ला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय मुल येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले. या घटनेमुळे आरोपी विरुद्ध तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments