ADvt

जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईयवतमाळ :- सुरज चाटे

    यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाहीत तसेच अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांचे अधिनस्त पथकांना अवैध धंदयाची गोपनिय माहीती काढून प्रभावी रेड कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या.
    
      दिनांक १८/०६/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांना माहीती मीळाली की, केळापूर येथील पारवा जाणारे रोडवर संतोषी माता मंदीरालगत असलेल्या नवाडे रा. केळापूर याचे मालकीचे घरातील बंद खोलीत काही इसम बावन्न तास पत्त्यावर पैशाची बाजी लावुन एक्का बादशहा नावाचा हारजीतचा जुगाराचा खेळ खेळत, असून सदर ठिकाणी बाहेरगावाहुन लोक जुगार खेळण्यासाठी आलेले आहेत. 

     अशा खात्रीशीर खबरेवरुन वरीष्ठांचे परवाणगीने पोलीस निरीक्षक स्थागुशा यांनी सदर ठिकाणी रेड कारवाई करणे बाबत आदेश अधिनस्त पथकाला दिल्याने स्थागुशा चे पथकाने सदर बातमीची शहनिशा करुन जुगार रेड केला असता नवाडे यांचे घराचे बंद खोलीतील घटनास्थळावर इसम नामे १) गब्बर मोतेखां पठाण रा. रामनगर यवतमाळ २) रणजीत फुलसींग चव्हाण रा राममंदीर वॉर्ड पांढरकवडा ३) इश्वर सुधाकर ठाकरे रा पेटवॉर्ड राजुरा जि. चंद्रपूर ४) आदिल हुसेन पासवाल रा. लोहारलाईन पांढरकवडा ५) शालेन्द्र भाउराव चव्हाण रा. कोरपना जि. चंद्रपूर ६) आवेज शकील अन्सारी रा. मालाना आझाद वॉर्ड राजुरा ७) शुभम अशोक राय रा. आंबेडकर चौक पांढरकवडा ८) मोहम्मद मक्सुद मोहम्मद मन्सुर पारेख रा. कोरपना, चंद्रपूर ९) सैयद जिब्राईल सैयद इब्राहीम रा. भिवापूर बॉर्ड चंद्रपूर १०) सचिन केशव मुद्यलवार रा. गढी वॉर्ड पांढरकवडा ११) प्रियम अशोक राय वय २४ वर्ष रा. आखाडा वार्ड पांढरकवडा १२) सिनु राजु झुपाका रा. लक्कडकोट ता. राजुरा जि. चंद्रपूर १३) मिथुन छगन चावरे रा. आंबेडकर बॉर्ड पांढरकवडा १४) शेख आसीफ शेख चांद रा. पारवा १५) साहील शफाक शेख रा. शिवाजी वॉर्ड राजुरा जि. चंद्रपूर १६) शकिल शेख चांद रा. पारवा १७) प्रमोद उत्तमराव भोयर रा केळापूर १८) आकाश किशोर बोरेले रा. शास्त्री नगर पांढरकवडा १९) आकाश पृथ्वीराज तिवारी रा. चापनवाडी यवतमाळ २०) गणेश पांडुरंग आस्वले रा. वसंतनगर घाटंजी २१) आशिष धिरज बहुरीया रा.. सातल सुभाष वार्ड बल्लारशहा २२) हाफीजुर रहेमान खलीलुर रहेमान रा. विराणी टॉकीज रोड वणी, हे मीळून आले आरोपीतांचे ताब्यातून व डावावरील एक्का बादशहा जुगाराचे १) नगदी १८,११,५००/- रु २) १५ नग मोबाईल फोन ३,३०,५००/- रु ३) तिन नग तासपत्ते कॅट ३००/- रु ४) सहा नग गादया ३००/- रु ५) तिन नग कार कि. अं. ३७,००,०००/- रु असा एकुण ५८,४४,८००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद प्रकरणात पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे अपराध क्रमांक ७५४ / २३ कलम ४, ५ मजुका सह कलम १०९ भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     यवतमाळ जिल्हयात अवैधरित्या जुगार क्लब संस्कृतीला कुठल्याही प्रकारे थारा मिळणार नाही तसेच अशा प्रकारचे जुगार क्लब तसेच जुगाराचे धंदयांमध्ये लिप्त असलेल्या इसमांवर प्रभावी कारवाई करण्याचे यवतमाळ जिल्हा पोलीस दलाचे धोरण आहे.

     सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पीयुष जगताप यांचे मार्गदर्शनात श्री. प्रदीप परदेशी पो.नि. स्थागुशा, सपोनि विवेक देशमुख, पोउपनि राहुल गुहे, सहाफी बंड डांगे, पोहवा सैयद साजीद, अजय डोळे, रुपेश पाली, नापोशी विनोद राठोड, निलेश राठोड, रितुराज मेडवे, पोशी धनंजय श्रीरामे, चालक अमीत कुमरे यांचे स्थागुशा येथिल पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Post a Comment

0 Comments