ADvt

वणीच्या मोक्षधामात होणार जयस्वाल दांपत्य व चिमुरडीच्या च्या पार्थिवावर अंत्य संस्कार...




वणीच्या मोक्षधामात होणार जयस्वाल दांपत्य व चिमुरडीच्या च्या पार्थिवावर अंत्य संस्कार...

पार्थिव घेऊन कुटुंबीय वणीच्या दिशेने रवाना...

वणी :- सुरज चाटे

    उत्तराखंड येथे चारधाम यात्रेकरिता गेलेले राजा जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल व त्यांची दोन वर्षाची चिमुकली काशी जयस्वाल असे एकाच कुटुंबातील तीन जण केदारनाथ जवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली असून त्यांचे नातेवाईक त्यांचे मृतदेह घेऊन रुद्रप्रयाग (उत्तराखंड) वरून वणीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे. उत्तराखंड वरून दिल्ली व दिल्ली वरून नागपूर आणि नागपूर वरून मंगळवार १७ जूनला सायंकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत वणी येथे त्यांचे मृतदेह पोहोचणार असुन रवि नगर वणी येथुन अंत्य यात्रा निघणार आहे. दि. १८ ला त्यांच्या पार्थिवावर वणी येथे अंतिमसंस्कार करण्यात येणार आहे.
     Three members of the same family, Raja Jaiswal, his wife Shraddha Jaiswal and their two-year-old daughter Kashi Jaiswal, who had gone on a Chardham pilgrimage in Uttarakhand, died in a helicopter crash near Kedarnath. Their bodies have been identified and it is learnt that their relatives have left for Wani from Rudraprayag (Uttarakhand) with their bodies. Their bodies will reach Wani from Uttarakhand via Delhi and from Delhi to Nagpur and from Nagpur by Tuesday, June 17 evening or late night and the funeral procession will start from Ravi Nagar Wani. Their bodies will be cremated in Wani on the 18th.
     घटनेची माहिती मिळताच शोककळा पसरली होती. जयस्वाल कुटुंबासोबत देव दर्शनाला गेलेलं महाजन दाम्पत्य व जयस्वाल कुटुंबातील सदस्य हे तिघांचेही मृतदेह घेऊन रुद्रप्रयाग (उत्तराखंड) वरून निघाल्याची माहिती मिळाली आहे.
    दि. १७ जून ला सायंकाळ किंवा रात्री उशिरापर्यंत जयस्वाल दाम्पत्य व चिमुरडीचे पार्थिव वणी येथे पोहचणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जयस्वाल पती पत्नी व चिमुरडीचा मृतदेह वणी येथे पोहचल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर वणी येथील मोक्षधाम येथे दि. १८ ला सकाळी ९ वाजता त्यांच्या निवास स्थान रवि नगर येथुन अंत्ययात्रा निघणार आहे. आप्तस्वकीय व मित्रमंडळींच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार होणार आहे. देव दर्शनाला गेलेल्या जयस्वाल दाम्पत्यावर असा हा दुर्दैवी मृत्यू ओढावल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments