वणी शहरात दुषित पाण्याचा पुरवठा....
पालिकेकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ:- अनेक भागात हिरवे व पिवळे पाणी...
वणी :- सुरज चाटे
जल ही जीवन है.... असे म्हटल्या जाते. परंतु पालिकेकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असुन चक्क गाळ युक्त व हिरवे, पिवळे पाणी पालिकेच्या नळा तुन नागरिकांना मिळत असल्याने पालिका नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे का?... असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान टागोर चौक परिसरातील विक्रांत चचडा यांच्या घरी सुद्धा हिरवे पाणी आल्याने त्यांनी तशी दूरध्वनीद्वारे तक्रार मुख्याधिकारी वणी यांना केली आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास जनतेसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी मी आंदोलन करणार असा इशारा विक्रांत चचडा यांनी दिला आहे
The question is being raised whether the municipality is playing with the lives of the citizens as the citizens are getting muddy, green and yellow water from the municipal taps. Meanwhile, Vikrant Chachda's house in Tagore Chowk area has also received green water and he has complained to the Chief Officer Wani over the phone.
जीवनात पाणी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दुषित पाण्यामुळे अनेक शरीराच्या बिमाऱ्या होण्याचे नाकारता येत नाही. मग पालिके मार्फत दुषित पाणी पुरवठा वणीतील विविध भागात होत असल्याने नागरिकांत अरोग्या संबंधात धोक्याची घंटा वाजत आहे. त्यामुळे याला जबाबदार कोण?... संबंधित अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष आहे का?.. असा सवाल उपस्थित होत असून टागोर चौक परिसरातील अनेक घरी तसेच विक्रांत चचडा यांच्या घरी दुषित व हिरवेगार पाणी नळातुन आल्याने त्यांनी तात्काळ मुख्याधिकारी वणी यांना दूरध्वनी द्वारे याची तक्रार केली आहे.
पावसाळा आला की अनेक पाण्या संबंधातील आजार आपले डोके वर काढतात मग आता चक्क नळातूनच दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने हे पाणी फिल्टर होत आहे की नाही? यावर सुद्धा प्रश्न चिन्ह निर्माण होत असून यांवर तातडीने संबंधित अधिकाऱ्याने योग्य ती उपाययोजना करून जनतेच्या जीवशी होणारा खेळ थांबावावा अशी मागणी जोर धरत आहे. योग्य ती कारवाई न झाल्यास जनतेसाठी व त्यांच्या आरोग्यासाठी मी आंदोलन करणार असा इशारा विक्रांत चचडा यांनी दिला आहे
0 Comments