ADvt

वणीतील युवकाची निलगिरी बनात गळफास घेऊन आत्महत्या SUICIDEवणी : सुरज चाटे

     वणी शहरातील जैताई नगर येथील रहिवासी असलेल्या एका युवकाने वणी - घुग्गुस रोडवर असलेल्या निलगिरी बनात एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 19 जुन 2023 ला दुपारच्या दरम्यान उघडकीस आली.

     वणीतील जैताई नगर, गायकवाड फैल येथील रहिवासी असलेले तिरुपती कन्नूरवार यांचा मुलगा सनी कन्नूरवार, वय 22 वर्ष , रा. जैताई नगर वणी याने निलगिरी बनातील गार्डन मधील झाडाला दि.19 जुन 2023 ला 1 वाजता दुपार चे सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली, सनी ने इतके मोठे टोकाचे पाऊल का उचलले? याचे कारण अस्पष्ट असुन. प्रेमप्रकरणातून ही आत्महत्या आहे काय? असे विविध प्रश्न उपस्थित होत असुन, या घटनेची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास वणी पोलीस करत आहे. सनी च्या मागे आई वडील व बराच मोठा आप्त परिवार आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments