ADvt

अखेर कुख्यात गब्या पोलिसांच्या जाळ्यात...वणी :- सुरज चाटे

 पत्रकारावर सशस्त्र हल्ला करून फरार आरोपी मो नावेद उर्फ गब्या वणी पोलीसांच्या ताब्यात पोलीस स्टेशन वणी परीसरातील कुख्यात चोरटा मो नावेद उर्फ गब्या मो कादीर रा.मोमीनपुरा वणी ता. वणी व मा. सत्र न्यायालय केळापुर यांनी शासकीय कर्मचा-यांवर हमला प्रकरणातील गुन्हयात व मा. प्रथम न्यायदंडाधिकारी वणी ज्यांनी विविध चोरीचे ०६ गुन्हयात शिक्षा सुनावली होती तेव्हापासून तो यवतमाळ कारागृहात बंदीस्त होता.
      सजा भोगत असताना त्याने कोरोणा आजाराचे काळात आजाराचे सोंग केल्याने त्यास उपचाराकरीता यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याच दरम्यान त्याने पोलीसांना चकमा देवुन तो पोलिस कस्टडी गार्ड येथुन मागील दिड वर्षापासून फरार होता. पोलीस त्याचा वारंवार शोध घेत असतांना तो पोलीसांचे हातावर तुरी देत होता. त्याच दरम्यान दिनांक १२/१०/२०२२ रोजी फिर्यादी नामे मो. आसीफ मोहम्मद शरीफ शेख वय ५६ वर्ष पत्रकार रा.गाडगेबाबा चौक वणी यांच्या घरी जबरी चोरी करून त्यांना लोखंडी रॉड डोक्यात मारून जखमी करणारा आरोपी हा गब्या होता असा पोलीसांना संशय होता.
     नमुद गुन्हयाचा बारकाईने तपास करून नमुद गुन्हयात संशईत आरोपी गब्या याचा मागील ९ महिन्या पासुन वेगवेगळया ठिकाणी संपूर्ण यवतमाळ जिल्हयाचे पोलीस शोध घेत असतांना नमुद आरोपी बाबत दिनांक १०/०६/२३ रोजी डि.बी. पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की नमुद आरोपी हा कामठी नागपुर येथे त्याचे भावाचे लग्नाकरीता येणार आहे अशी खात्रीशिर माहिती असल्याने वरीष्ठांचे परवानगीने नमुद ठिकाणी सपोनि / माधव शिंदे पोहेकॉ / सुहास मंदावार, पोना/सचिन मरकाम, पोकों/ विशाल गेडाम यांचे पथक पाठविले असता नमुद पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. नमुद आरोपीस बारकाईने विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदरची कार्यवाही मा. डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. गणेश किंद्रे उप.वि.पो.अ. वणी यांचे मार्गदर्शनात पोनि प्रदिप शिरस्कर ठाणेदार पोलीस स्टेशन वणी सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, पोहवा / सुहास मंदावार, पोना/सचिन मरकाम, पोकॉ/ विशाल गेडाम यांनी केली. पुढील तपास पोउपनि / आशीष झिमटे हे करीत आहे.

Post a Comment

0 Comments