महिला समितीच्या वतीने कर्मयोगी पूजा जाधव यांचा सत्कार
*गावा समोर ठेवला आदर्श :- चोळी देऊन केला आईचा सन्मान*......
वणी (गणेशपूर ) :- सुरज चाटे
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला समारोह समिती वणी गणेशपूर यांच्या वतीने पुजाताई रमेश जाधव यांनी psi (पोलीस उपनिरीक्षक) ची परीक्षा उत्तीर्ण करून आपल्या गावचे नाव रोशन केले . त्या निमित्याने गावातून मोठ्या स्वरूपात वाजा गाजा करून मिरवणूक काढण्यात आली ह्यावेळी ग्राम पंचायतच्या पाटांगण समोर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ह्या कार्यक्रमात समितीच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला, यावेळी गावची तानी पोलीस उपनिरीक्षक झाली असे जेष्ठांकडून बोलल्या जात होते.
जिद्द चिकाटी, कठीण परिश्रम याने सगळं काही शक्य होत असते, यावर मात करत गावची तानी आज पोलीस उपनिरीक्षक झाली आहे, गावातील लोकांचा सत्कार पाहून आईच्या डोळ्यातील आनंदाश्रू अनावर आले आणि तानीले लाल दिव्याची गाडी लागली व बाई असेच काहीसे शब्द आनंदात बाहेर पडू लागले.
यावेळी समितीच्या महिलांनी शाल व श्रीफळ साडी चोळी देऊन आईचा देखिल सन्मान केला व पोलीस उपनिरीक्षक पूजाला पुस्तक म्हणुन भेट वस्तू देण्यात आले. दरम्यान सौं वृषालीताई खानझोडे माजी उपसभापती प सं वणी, दर्शनाताई पाटील, नंदाताई वांढरे, मीनाक्षीताई मोहिते, गुड्डीताई तूरकर, प्रीतीताई भेंडाळे,रंजनाताई भेंडाळे, सावित्रीताई निब्रड, आशाताई निब्रड, आशाताई कवरासे, कविता ढेंगळे,मनीषाताई कवरासे,प्रेमा ताई सिडाम, सुप्रियाताई राजगडकर, प्रियंकाताई मेश्राम, अनिताताई मेश्राम, व महिला उपस्थित होत्या
0 Comments