ADvt

रंगनाथ नगर येथिल अब्बास शेख यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन


वणी :- सुरज चाटे 

     वणीतील बहुचर्चित असलेले रंगनाथ नगर येथील रहिवासी अब्बास अनवर शेख, वय 47 वर्ष, यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद घटना दिनांक 08 ला सायंकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान घडली. 
        वणी येथील रंगनाथ नगर येथील रहिवासी असलेले, मिस्त्री काम करणारे, एक होतकरू व कष्टकरू नेतृत्व अशी ओळख असणारे अब्बास अनवर शेख, वय 47 वर्ष हे दिनांक 08 ला सायंकाळी 10.30 वाजताच्या दरम्यान जेवण करून बसुन असता जळकी लागत आहे असे परिवारातील सदस्यांना सांगितले त्यावरून घरच्यांनी सांगितले की, आराम कर मात्र त्याला जगातूनच आराम मिळाला. काही करण्या अगोदरच, अब्बास याला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. हृदय विकाराचा झटका इतका तीव्र होता की, हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, बहीण, भाऊजी व बराच मोठा आप्त परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त हक्त आहे. 

Post a Comment

0 Comments