युवासेनेच एक निर्भीड निस्वार्थी व्यक्तिमत्त्व.... विक्रांत नंदकिशोर चचडा....
वणी :- सूरज चाटे
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अत्यंत जोमाने जनतेचे प्रश्न निस्वार्थ हेतूने समाजकारणाचा एकमेव हेतू ठेऊन सोडवीत असतात असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे विक्रांत नंदकिशोर चचडा.
वंदनीय शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या शिवसेना तथा युवासेना प्रमुख तथा माजी पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे, माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर यांच्या मार्गदर्शनात वडीलांना आवडत असलेले जनसेवेचे पाऊल त्यांच्याच पावलावर पाउल टाकत यवतमाळ युवासेना जिल्हाध्यक्ष पदाची कमान स्वर्गवासी नंदकिशोरजी चचडा यांचे चिरंजीव विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी अत्यंत योग्य पध्दतीने पार पाडत जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडण्यात त्यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. युवासेनेच जिल्हाध्यक्ष पद हाथी घेताच काही कालावधीतच जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडन्याचे काम त्यांनी केले आहे. अतिशय कमी वयात राजकारणाशी जुळले, मात्र त्यांच्या वडिलांकडून मिळालेले इमानदार जनसेवेचे धडे हे विक्रांत करिता संजीवनी ठरली.
युवासेनेच उगवत नेतृत्व म्हणजे विक्रांत नंदकिशोर चचडा, युवासेनेचे कार्य प्रत्येक पातळीवर महाराष्ट्रभर अतुलनीय असून त्यातुन अनेकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य युवासेने मार्फत पदाधिकारी व कार्यकर्ते करीत असतात अशाच कार्याची दखल घेत आपल्या जनतेला कोणताही त्रास व कोणी वरचढ होऊ नये हा एकमात्र दृष्टिकोन ठेऊन रीतसर लढणारे काही दिवसातच आपल्या आक्रमक स्वभावाने आपल्या भाषेतून अनेकांच्या मनावर राज्य करून बुलंद तोफ म्हणून परिचित असणारे नेहमी गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे व वेळप्रसंगी आर्थिक मदतीचा हाथ देखील समोर करणारे असे एकमात्र नेतृत्व म्हणजे युवासेनेचे यवतमाळ माजी जिल्हाध्यक्ष तथा एन एच फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष विक्रांत नंदकिशोरजी चचडा. यांना काही दिवसातच एक मोठी जबाबदारीही मिळणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली असुन वणीचा विक्रांत लवकरच एक महत्वाच्या जबाबदार भूमिकेतही दिसणार असल्याचे बोलल्या जात आहे अशा जनसेवकाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.......
0 Comments