ADvt

गौरक्षणासाठी सरसावले खाडे कुटुंबीय....वणी : सुरज चाटे

     येथील उज्वल गौरक्षण संस्थेला रंगनाथस्वामी अर्बन निधी लि. वणीचे अध्यक्ष संजय रामचंद्र खाडे, यांनी 51 हजार रूपयांचा धनादेश देवून आर्थिक मदत केली आहे. यावेळी सहकुटुंब सहपरिवारासह त्यांनी गोमातेला चारा खाऊ घातला.  

     याप्रसंगी श्री लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. संगिता संजय खाडे, रंगनाथस्वामी अर्बन निधी चे उपाध्यक्ष ईश्वर खाडे, उज्वल गोरक्षण संस्थेचे पदाधिकारी राजाभाऊ पाथ्रडकर, सुधाकर काळे (गुरुजी) अजय चेंदे, प्रकाश कवरासे, अनुप खत्री, डॉ. राठोड, संजय पांडे, भगवान पोपली, मनोहर नागदेव, चंद्रकांत जोबनपुत्रा तसेच मित्रमंडळी आनंद खोकले, सुहास लांडे, प्रतिक गेडाम आदि मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments