ADvt

त्याने डोळ्यात फेकली मिरची पावडर तर एकाने दाखवला चाकूचा धाक....



फिल्मी स्टाईल चोरी करणारे चोरटे गजाआड :- एक विधिसंघर्षग्रस्त बालक, 8 इसम ताब्यात

वणी :- सुरज चाटे

     पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीत दिनांक ०३/१०/२०२३ रोजी २३/०० वा. चे सुमारास पांढरकवडा येथील कर्मचारी वसाहत येथे राहणारे हनुमंत नरसया कदोरेवार हे त्यांचे बोरले वाईन शॉप बंद करुन दुकाणात दिवसभरात जमा झालेल्या व्यवसायाची रक्कम नगदी २,४०,००० रु त्यांचेकडील अॅक्टीवा मोटर सायकलचे डिक्कीत टाकुन घरी आले व चाबी लावून असलेली मोटार सायकल गेट समोर उभी ठेवून गेट उघडत असतांना एक अनोळखी इसम त्यांचे गाडीवर बसतांना दिसल्याने ते गाडी कडे परत जात असतांना दुसऱ्या इसमाने मिरची पावडर त्यांचे डोळयावर फेकली व दोन्ही इसम गाडीवर बसुन पळून जात असतांना हनुमंत कदीरेवार यांनी पाठलाग केला असता मागे बसलेल्या इसमाने चाकुने त्यांचेवर वार केल्याने हनुमत कदीरेवार यांचे तळहाताला जखम झाली व ते दोन्ही अनोळखी इसम मोटर सायकल व डिक्कीत ठेवून असलेली रक्कम घेवून पळून गेल्याची घटना घडली होती. त्यावरून हनुमंत नरसया कदीरेवार यांनी दिनांक ०४/१०/२०२३ रोजी पो.स्टे. पांढरकवडा येथे दिलेल्या तक्रारी वरुन अज्ञात आरोपीविरुध्द अप.क्र. ११२२/२०२३ कलम ३९४,३४ भादवि प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता..

     घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणन्याच्या सुचना मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी पो.स्टे. पांढरकवडा व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व पोलीस स्टेशन पांढरकवडा येथील पथक अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे करीता तांत्रीक बाबी पडताळुन व गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास करीत असतांना एका संशयीता विरुध्द संशय बळावल्याने त्यास चौकशी कामी बोलावुन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवून त्याने त्याचे इतर साथीदार यांचेसह मिळुन गुन्हा केला असल्याची व सदर गुन्हयासोबतच अधिक दोन गुन्हे केले असल्याचे कबुली दिली, असल्याने त्याचे इतर सहा साथीदार व एक विधीसंघर्षग्रस्त बालक अशा ०८ इसमांना ताब्यात घेण्यात आले असुन नमुद संशयीताने प्रत्येक गुन्हा हा वेगवेगळे साथीदारांसह मिळुन केला असल्याचे तपासात दिसून येत असुन नमुद आरोपीतांकडून पो.स्टे. पांढरकवडा येथील उपरोक्त नमुद गुन्हयासह (१) अप.क्र १९३८ / २०२३ कलम ३९४,३४ भादवि (२) अप.क्र.६३५/२०२३ कलम ३७९,३४ भादवि असे इतर दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. पैकी अप.क्र. ११३८/२०२३ या गुन्हयात आरोपीतांनी फिर्यादीवर हल्ला करुन नगदी १,७६,६५५ रु जबरी हिसकावून नेले होते तर अप.क्र. ६३५ / २०२३ गुन्हयात १,७८,९३३ रु नगदी, ०१ टॅब कि.६००० रु. व सीजीटी ३३५ असा एकुण १,८५,२६८ रु चा मुद्देमाल चोरुन नेलेला होता..

    ताब्यात घेण्यात आलेले ०७ आरोपीत व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचेकडुन गुन्हयात चोरी गेलेली मोटर सायकल व नगदी ३५,००० रु अशी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीत यांना तपासकामी अटक करण्यात आली असुन त्यांची पोलीस कोठडी घेवुन ओळख परेड व इतर तपास करून मुद्देमाल हस्तगत करणे असल्याने त्यांचे नावांचा येथे उल्लेख करण्यात आलेला नसल्याचे सांगण्यात आले आहे.

     सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, श्री. रामेश्वर वेजने, उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा, श्री. आधासिंग सोनोने, पोलीस निरीक्षक, स्वा.गु.शा. श्री. अमोल माळवे पोलीस निरीक्षक पो.स्टे. पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात स्था.गु.शा. कडील सपोनि अतुल मोहनकर, अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश गवार, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत महावीर नरेश राउत, सतीष फुके, तसेच पो.स्टे. पांढरकवडा येथील पोउपनि योगेश रंधे, नितीन सुशीर, पोलीस अंमलदार प्रमोद जुनुनकर, अंकुश चहाळे, मारोती पाटील, सचिन काकडे, छंदक मनावर, राजु बेलेवार, राजु मुत्तलवार, सूर्यकांत गिते यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Post a Comment

0 Comments