समजिकतेची जान ठेऊन लावलेलं रोपट आज झालं चार वर्षाचं.... ते म्हणजे रॉयल फाऊंडेशन...
ॲड. निलेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली चार वर्षाची यशस्वी वाटचाल....
अनेक सामाजिक उपक्रम राबवून जपली सामाजिक बांधिलकी...
वणी :- सुरज चाटे
वणी सह परिसरात अनेक सामाजिक संघटना काम करीत आहेत. त्यातीलच एक म्हणजे रॉयल फाऊंडेशन. रॉयल फाऊंडेशन ही संस्था वणीतीलच सुप्रसिद्ध अधिवक्ता तसेच भाजपा चे शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नावा रुपात आली. बघता बघता या फाऊंडेशन ला चार वर्ष पूर्ण झाली असुन अनेक सामाजिक उपक्रम घेत, सामाजिक बांधिलकी जपुन रॉयल फाऊंडेशन या रोपट्याचे चार वर्षात वटवृक्षात रूपांतर झाले आहे.
Royal Foundation is an organization that came into being under the chairmanship of Adv. Nilesh Maya Mahadevrao Chaudhary, a well-known advocate from Vani and BJP city president. In a short time, this foundation has completed four years and by taking up many social initiatives and maintaining social commitment, the sapling of Royal Foundation has transformed into a banyan tree in four years.
रॉयल फॉउंडेशन वणी ही सामाजिक बांधिलकी ची जान ठेऊन ही संस्था सुरू झाली. यात अँब्युलन्स सेवा, प्रत्येक कार्यालयात राज्यगित फलक लावणे, शिव चरीत्र अभ्यास ज्ञान परीक्षा, लाठी काठी शिबिर, मर्दानी खेळांचे शिबिर तसेच अनेक समजूपयोगी उपक्रम राबविले आहे. रॉयल फाऊंडेशन ला आज चार वर्ष पूर्ण होत आहे. सुरवात खडतर झाली. परंतु समाजाचं काही तरी देणं लागत हे सहकार्य .. मदत... सेवा या फाऊंडेशन चे ब्रिद असलेले सर्व सहकारी आणि सर्वांच्या सहकार्यामुळे आज हा टप्पा गाठाला आहे.
रॉयल फाउंडेशन चे भारत सरकार नीती आयोग कडे नोंदणी झाली असून, युनिक कोड सुद्धा प्राप्त झाला आहे. तसेच रॉयल फाउंडेशन ला कर विभागाचे १२-अ आणि ८०-सी चे प्रमाणपत्र सुद्धा प्रदान करण्यात आलेले आहे.
मागील काही वर्षात संस्थेद्वारे विवध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम राबविण्यात आले आहे. तसेच आरोग्य क्षेत्रात महत्वाची अशी संस्थेची एम्बुलंस सेवा सुद्धा सुरू आहे. अजुन खुप सामाजिक कामे करायचा माणस असुन खुप मोठा टप्पा गाठावयाचा आहे असे रॉयल फाऊंडेशन चे अध्यक्ष भाजपा चे शहराध्यक्ष ॲड. निलेश माया महादेवराव चौधरी यांनी बोलून दाखविले. तसेच फाऊंडेशन ला दिलेला भरभरून प्रतिसाद दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार सुद्धा व्यक्त केले आहे.
0 Comments