ADvt

वेंडली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...

 


वेंडली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा...

SATYABHASHA DESK - CHANDRAPUR 

   दि 15 शुक्रवारला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय वेंडली येथे 79 वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

     याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. शरदरावजी मंदे (सचिव, सावित्रीबाई फुले बहुउद्देशीय शिक्षण व प्रशिक्षण संस्था भोयगाव) तसेच ध्वजारोहक म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक मा. श्री. प्रकाशराव अलवलवार (सामाजिक कार्यकर्ते वेंडली) विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. श्रीकांतराव पिंपळशेंडे सर उपस्थित होते.

    मा.श्री. प्रकाशराव अलवलवार यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले, या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून स्काऊट गाईड पथकाद्वारे विद्यालयाच्या पटांगणात प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

     विद्यालयाच्या वतीने प्रमुख अतिथींचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ए. डी. ठाकरे मॅडम यांनी केले. या शुभप्रसंगी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता गोड मिठाई देऊन करण्यात आली.

    

Post a Comment

0 Comments