ADvt

महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टीकोणातून असाही एक जन्मदिवस साजरा...



वणी :- सुरज चाटे

     वणी विधानसभा क्षेत्राचे प्रसिद्ध नेतृत्व असलेले यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय भाऊ देरकर यांची पत्नी एकविरा महिला पतसंस्था तथा कुणबी समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा सन्मान स्त्री शक्तीचा महिला फाऊंडेशन च्या संस्थापकीय अध्यक्षा सौ किरणताई संजय देरकर यांनी आपला जन्मदिवस कोणताही आगाऊ खर्च तथा जन्मदिनाचा ओवा पोवा न करता गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करीत तसेच गोरगरीब विधवा महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शिलाई मशिन भेट देत एक आगळा वेगळा उपक्रम राबवित आपला जन्मदिवस साजरा केला. त्यांच्या या उपक्रमामुळे महिलांमध्ये एक संजीवनी निर्माण झाली असुन जिथे महिलांवर अत्याचार होईल तिथे सन्मान स्त्री शक्तीचा महिला फाऊंडेशन उभी असल्याचे यावेळी उपस्थित महिलांना किरण देरकर यांनी बोलून दाखविले. 
     
       जन्मदिवस म्हटले की मोठं मोठे केक, बुके, बँड, डी जी आदींचा खर्च आणि जेवणाची मेजवानी मग कुणी या की नका येऊ ....असाच प्रकार दिवसागणिक पहावयास मिळत असते. साधी सरळ राहणी व मनाचा राजा माणुस अशी ख्याती असणारे वणी विधानसभा क्षेत्राचे प्रसिद्ध नेतृत्व तथा राजकीय वर्तुळात किंगमेकर ची भूमिका बजावणारे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय भाऊ देरकर यांची पत्नी यांनी आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करीत महिलांना एक वेगळी संकल्पना या दृष्टीकोनातून देत समाजुपयोगी निर्णय घेत आपल्या जन्मदिनाचा वाजा गाजा न करता अतिशय साध्या व सरळ पद्धतीने आपला जन्मदिवस साजरा केला आहे, किरणताई देरकर ह्या समाजुपयोगी व जनसेवेच्या विविध कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात. एकविरा महिला पतसंस्था तथा कुणबी समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा सन्मान स्त्री शक्तीचा महिला फाऊंडेशन च्या संस्थापकीय अध्यक्षा सौ किरणताई संजय देरकर यांनी विधवा गोरगरीब व निराधार महिलांना आपल्या जन्मदिनानिमित्य विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यात गरजु विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. 

      तसेच गरजु व कष्टकरू होतकरू विधवा महिलांना शिलाई मशिन्स चे वाटप करण्यात आले यावेळी श्रीमती मीराबाई ढुमने, सविता गुरनुले - वेगाव, कु अश्विनी मोते - वेगाव, मिनाक्षी ताजने, श्रीमती गौरकार या गरीब कष्टकरी महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरिता शिलाई मशीन चे वाटप करण्यात आले. किरण ताई देरकर यापुढे सुद्धा ते अविरत महिलांना सक्षम करण्याकरिता मोहीम सुरू ठेवणार, महिलांवर होणारे अत्याचारा विरोधात नेहमी आवाज उठविणार असल्याचे उपस्थितांसमोर त्यांनी बोलून दाखविले. या कष्टकरू महिलांनी आपल्या हाताला किरण ताईने एक काम देत आपल्याला सक्षम केल्याने इतर महिलांनी किरण ताईला आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या. यावेळी महिलावर्ग मोठ्याप्रमाणात उपस्थित होता. 

Post a Comment

0 Comments