ADvt

सकाळ .....दुपार....संध्याकाळ....तीन अपघातात दोघांचा मृत्यू....

वणी :- सुरज चाटे

     दिवसागणिक अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. दिनांक 3 ऑक्टोबरला रात्री अं 11.25 वाजताच्या दरम्यान सिमेंटचा महाकाय टँकर TANKER राज्य महामार्गावर पलटला. तर दुसरी घटना रांगणा - वणी रोडवर ऑटो पलटी होऊन अपघातात एक जण ठार  तर चार विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. हि घटना बुधवारी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. तर तिसरी घटना ही मुरूम वाहणारे ट्रॅक्टर व ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात चालकाचा घटनास्थळीच मृत्यू DEATH झाल्याची दुर्दैवी घटना दि ४ ऑक्टोबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास वणी भालर मार्गावरील धोपटाळा तलाव, हनुमान मंदिरासमोर घडली आहे यामुळे 3 ची रात्र आणि 4 चा दिवस अल्टी - पल्टी चा ठरला असून यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

    पहिली घटना म्हणजे चंद्रपूर येथून लिक्विड सिमेंट घेऊन रस्ते बांधकाम होत असलेल्या ठिकाणी सिमेंट घेऊन टँकर जात होता. टँकर क्रमांक MH-34-BG-4309 चंद्रपूर वरून रात्री वणीत पोहचला. रात्री टँकर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि टँकर डिव्हायडरला धडकल्याचा कयास लावण्यात येत आहे. या घटनेत कोणालाही इजा पोहचली नाही. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास सुरू आहे.
      दुसरी घटना सेलू येथील ऑटोचालक, सेलू ते वणी असा ऑटो चालवतो. बुधवारी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास ऑटोचालक शंकर हा नेहमीप्रमाणे ऑटो क्रमांक (MH -29 V-8137)ने सेलू हून काही प्रवाशांना सोबत घेऊन नांदेपेरा येथे गेला. तिथून त्याने काही विद्यार्थ्यांना सोबत घेतले आणि ऑटो घेऊन तो रांगणा मार्गे वणीसाठी निघाला. त्यावेळी ऑटोत सुमारे अंदाजे 6 ते 8 जण असल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास रांगण्याजवळ ऑटो चालकाचे ऑटोवरील नियंत्रण सुटले व ऑटो रस्त्याच्या कडेला खाली जाऊन पलटी झाला असल्याचा कयास वर्तविण्यात येत आहे. यात गणपत धोंडू सातपुते (55) रा. सेलू हा गंभीर जखमी झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. जे विद्यार्थी किरकोळ जखमी होते त्यांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.
      तर तिसरी घटना वणी वरून भालरकडे मुरूम भरून जात असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाला. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाबाराव उत्तरवार वय अंदाजे ५५ वर्षे रा. न.प. शाळा क्रं. ८ जवळ, सेवा नगर असे या अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. भरधाव ट्रॅक्टर अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने ट्रॅक्टरखाली दबून चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मुरूम भरलेले ट्रॅक्टर वणी वरून भालरकडे जात असतांना चालकाचे ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटले व ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात बाबाराव उत्तरवार हा चालक ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. जेसीबीच्या साहाय्याने ट्रॅक्टर बाजूला करीत चालकाचा मृतदेह बाहेर काढला. तसेच घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविन्यात आला. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात जमादार जगदीश बोरनारे करीत आहे.
     दिनांक 3 व 4 हे वार घात वारच ठरले असुन 3 ची रात्र आणि 4 चा दिवस अल्टी - पल्टी चा ठरला असून यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

Post a Comment

0 Comments