ADvt

तरुणाने घेतला विषाचा घोट



वणी - सुरज चाटे

      वणी तालुक्यात आत्महत्याचे सत्र सुरूच असून दिनांक 1 ऑक्टोंबरला आणखी एका युवकाने विषाचा घोट घेत आयुष्य SUICIDE संपविल्याची घटना उघडकीस आली आहे.  
   
     दिवसागणिक आत्महत्येचे SUICIDE प्रमाण वाढत चालले असून विषाचा घोट घेऊन पुरड (नेरड) येथील युवकाने जीवनयात्रा संपविली आहे. हितेश बंडूजी कांबळे, वय २९ वर्ष, याने दिनांक 01 ला विषारी द्रव्य प्राशन केले, त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. हितेश बंडूजी कांबळे (२९) असे या आत्महत्या केलेल्या युवकांचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पण त्याने असा हा टोकाचा निर्णय का घेतला असावा? याचे कारण अद्याप अस्पष्ट असून हितेश च्या या निर्णयाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या अशा या अकाली जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मागे आई वडील, पत्नी व बराच मोठा आप्त परिवार आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 

Post a Comment

0 Comments