ADvt

ग्राहक व सभासदांच्या विश्वासाच्या बळावरच आज केशवनागरी प्रगतीपथावर.... सुनील देशपांडेवणी : वणीत मुख्यालय असलेल्या केशव नागरी सहकारी पतसंस्थेची स्वमालकीचे मुख्य कार्यालय "केशवस्मृती" या नवीन मुख्यालयाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.

 यावेळी अखिल भारतीय सह.संपर्क प्रमुख रा. स्व. संघांचे प्रमुख सुनील देशपांडे, प्रदेश महामंत्री सहकार भारती महाराष्ट्र राज्य, विवेक जुगादे, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री  हंसराज अहिर, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,  संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर खोंड आदी मान्यवर व्यासपिठावर पिठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर खोंड यांनी केली,सर्व सामान्य घटकापर्यंत पोहचण्याचे  आमचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले, यावेळी शाखा विस्तार करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. ते आपल्या प्रास्ताविकेतून बोलताना सामाजिक हित जोपसणारी संस्था असल्याचे सांगितलं. प्रदेश महामंत्री विवेक जुगादे यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर भाष्य केले, या प्रसंगी बोलताना पतसंस्थाना प्रशिक्षणाची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. लोकांचा विश्वास अधिकाधिक वाढत असल्याचेही ते म्हणाले. हंसराज अहिर यांनी पतसंस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आपल्या भाषणात त्यांनी संस्थेचे भरभरून कौतुक केले, सुनील देशपांडे हे प्रकल्प पुरुष आहे. असे ते यावेळी बोलताना म्हणाले. आमदार मदन येरावार यांचा निरोप वाचून दाखवण्यात आला. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी संस्थेच्या कार्याचे अथोचित कौतुक केले, शेतकरी, युवक, बेरोजगार, व्यावसायिक यांना संस्थेकडून कशा पद्धतीने आर्थिक मदत मिळते तेही सांगितले.

     यावेळी विविध क्षेत्रात कार्य करण्याऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बचतीचे महत्व कळावे म्हणून विद्यार्थ्यांना गुल्लफ वाटप करण्यात आले.  कार्यक्रमाचे उदघाटक सुनील देशपांडे यांनी भगवान बुद्धांचा विचार आपल्या भाषणातून मांडला, त्यांच्या अष्टांगिक मार्गांवर सविस्तर असे विवेचन केले.हे अष्टांगिक मार्ग व्यक्तिगत तथा संस्थात्मक क्षेत्रात कसे महत्वाचे आहे त्यावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच ग्राहक व सभासदांच्या विश्वासाच्या बळावरच आज केशवनागरी प्रगतीपथावर असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखवले. कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे सचिव अनिल आक्केवार यांनी केले. तर संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक दिकुंडवार यांनी सर्वांचे आभार मानले, रेणुका अणे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली, यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, सभासद, ग्राहक वर्ग, संस्थेचे पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी या लोकार्पण सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments