ADvt

संजय देरकर यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला अखेर यश....



वणी :- सुरज चाटे

      तालुक्यात मोठ्या प्रमाणात वेकोलीने आपले जाळे विणले आहे. अनेक ठिकाणी वेकोलीत खाजगी वाहन चालक कार्यरत आहे. परंतु त्यांची आर्थिक व मानसिक पिळवणूक होत होती, त्यामुळे त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन वारंवार निवेदने देण्यात आले होते, परंतु कोणतेही योग्य पाऊल वेकोलीकडून उचलण्यात आले नसल्यामुळे एकता असोसिएशन चे संस्थापक संजय देरकर यांच्या नेतृत्वात सर्व चालकांनी दिनांक 28 डिसेंबर पासुन कामबंद आंदोलनाची आक्रमक भूमिका घेतली होती त्यामुळे वेकोलीत खाजगी वाहतूक ठप्प झाली होती दरम्यान याचा फटका वेकोलीला चांगलाच बसल्याने तात्काळ वेकोलीने आंदोलांकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत लेखी आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला.
     A large number of Vekoli have woven their web in the taluk. There are many places where private drivers are working in the streets. But they were being oppressed financially and psychologically, so repeated representations were made regarding their various demands, but no proper steps were taken from Vekoli, all the drivers under the leadership of Sanjay Derkar, founder of Ekta Association, took an aggressive stand for strike action from December 28. The strike was called off after Vekoli agreed to the demands of the protestors and immediately agreed to the demands of the protestors as Vekoli was badly hit by the private transport.


     वणी परिसरात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सर्व ट्रॅव्हल्स कंपन्या किंवा चालकांवर अन्याय होत होता. ज्याबद्दल वेळोवेळी आधीच लेखी माहिती दिली होती, त्याचे निराकरण होताना कुठेही दिसत नव्हते, त्यामुळे विविध अडचणी घेऊन ज्यात 1) 16 तास आणि 24 तास चालणार्‍या गाडीत एकच ड्रायव्हर कार्यरत असतो,  2) किमान वेतन कायद्यानुसार वेतन न देणे, 3) पगार वेळेवर न देणे, 4) 28 किंवा 29 दिवस काम करूनही 20 दिवस हजेरी देणे, 5) पी. एफ. योग्य कट करत नाही, अशा महत्वाच्या अडचणींना खाजगी वेकोली चालकांना सामोरे जावे लागत होते. दरम्यान दिनांक 28 पासून संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा पवित्रा हाथी घेतला होता या आंदोलनामुळे वेकोलीची खाजगी वाहतूक ठप्प होऊन त्यांना मोठे नुकसान देखील सहन करावे लागले त्यामुळे या बाबींचा विचार करीत वेकोलीने तातडीची बैठक बोलावीत 1)वाहचालक यांना NIT च्या तत्वावर वाहन चालवीत फक्त 8 / 12 करण्यात येणार, 2) वर्क ऑर्डर प्रमाणे जे मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येईल, 3)मासिक वेतन प्रति महिना 10 तारखेलाच देण्यात येणार, 4) 26 दिवसाचे काम करण्यात येणार व मिनिमम वेजेस प्रमाणे पगार देण्यात येणार, 5) पि. एफ. व पगार पत्र प्रत्येक महिण्यात लिखित स्वरूपात देण्यात येणार या मांगण्या बैठकीअंती वेकोली व ट्रॅव्हल्स एजेन्सी मार्फत लेखी आश्वासन देऊन काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले. 
     यावेळी शिवसेना नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष, संस्थांपक एकता असोसिएशन संजय देरकर वेकोली क्षेत्रीय प्रबंधक यु. सी. गुप्ताजी, उदय कुमार नोडलं अधिकारी वाणी नॉर्थ, संजय देठे,डाँ जगन जुनघरी, वसंता डुकरे, फैजल बशीर खान प्रवीण खानझोडे व संघटनेचे पदाधिकारी विजय सिंग, आकाश गौतम. राकेश वारारकार, रजिक शेख, जतींदर सिंग, राजू चिंचोलकर, फारुख पठाण, राजू यादव, चंदन हिकरे, प्रशांत मिलमीले, विलास मंदे, विशाल राऊत, नवरतन भावरकर हाय वेळी शेकडो वाहचालक व उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments