ADvt

वणीत एक विवाह ऐसा भी....19 जोडपे गुंतले विवाहबंधणात....





आमेर बिल्डर्स चे संचालक जम्मु खान यांचा उत्कृष्ठ उपक्रम :- प्रत्येक जोडप्याना दिड लाखाच्या भेटवस्तू, जन्मदिनी अनोखो सोहळा....

वणी :- सुरज चाटे

     अनेक जन्मदिवस विविध पद्धतीने साजरे केले जाते, परंतु जगात काही असे व्यक्ती सुद्धा असतात की ते आपल्या खुशीपेक्षा दुसऱ्याला सुखी समाधानी ठेवण्यातच जास्त सुखी समजतात अशातलाच एक मनाचा श्रीमंत माणूस आमेर बिल्डर्स चे संचालक जम्मु खान (जम्मु भाई) यांच्या जन्मदिनी शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी मोमीनपुरा येथील आशियाना हॉल येथे मोफत सामूहिक विवाह (निकाह) सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात 19 जोडप्यांच्या निकाह झाला. आमेर बिल्डर अँड डेव्हलपर्सचे संचालक जमीर उर्फ जम्मू खान यांच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा असुन, विशेष 19 जोडप्याना विवाह बंधनात गुंतविण्याचा हा अविस्मरणीय क्षण ठरला आहे. या कार्यक्रमाला वणीतील प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नव दाम्पत्यांना आशीर्वाद सुद्धा दिला.  

     Many birthdays are celebrated in different ways, but there are some people in the world who are more happy to make others happy than their own. One such rich man, Amer Builders Director Jammu Khan (Jammu Bhai) celebrated his birthday on Saturday 30th December at Mominpura. A free Mass Marriage (Nikah) ceremony was held at the Asiana Hall with enthusiasm. 19 couples got married in this ceremony. Amer Builder & Developers Director Jameer alias Jammu Khan's venture is the talk of the town and it has become an unforgettable moment of tying the knot with a special 19 couples. The event was attended by eminent dignitaries from the forest. He also blessed the newlyweds.


    जसे लग्नकरण्याची ईच्छा , आवड व त्याच पद्धतीने नियोजन आखण्याची तयारी जशी असते त्याच पद्धतीने त्यांची सुद्धा तशीच तयारी करीत, नियोजन बद्ध संध्याकाळी 6 वाजता विराणी येथून बग्गी आणि घोड्यावर विराजमान असलेल्या नवरदेवांची वाजत वरात निघाली. ही वरात शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून याचा शेवट आशियाना हॉल येथे झाला. 7 वाजता सामुहिक विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. मौलवीद्वारा हाफिज-ए-कुराण पठन करून या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे जम्मू खान यांच्याद्वारे शाल, स्मृतिचिन्ह व बुके देऊन स्वागत करण्यात आले. तर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी आमदार प्रतिभा धानोरकर यांचे स्वागत जम्मू यांच्या पत्नी आसमां जम्मू खान यांनी केले.

         प्रमुख अतिथी असलेल्या आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, प्रतिभा धानोरकर, फारुक चीनी इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त करत जम्मू खान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रात्री. 8.30 वाजता मुख्य विवाह सोहळ्याला सुरुवात झाली. सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थित वधूवरांना 1.25 ते 1.50 लाखांच्या भेटवस्तू जम्मू शेख यांच्यातर्फे देण्यात आल्या. निकाह पार पडल्यानंतर सोहळ्यात उपस्थित सुमारे 10 हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. 




    निकाह (लग्न) लावण्यासाठी खास मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथून हफिज सईद अख्तर या मौलवींना बोलवण्यात आले होते. त्यांना वणीतील मौलानांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला संजय देरकर, विजय चोरडिया, भाई अमन, राकेश खुराणा, ऍड देविदास काळे, रवी बेलूरकर, हाजी फारुख, शमीम अहेमद, रज्जाक पठाण, संजय खाडे, राहुल मोटवानी, राजा पाथ्रटकर, निकेत गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या सामूहिक निकाह कार्यक्रमाची मुख्य अट ही वर किंवा वधू यातील एक व्यक्ती वणी तालुक्यातील असणे गरजेचे होते. तसेच तलाक झालेल्या वधू वरांचा समावेश या निकाह सोहळ्यात नव्हता. गरीब जे स्वखर्चाने विवाह करू शकत नाही अशा गरीब वधू वरांसाठी हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments