ADvt

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तालुका काँग्रेस कमिटीचे ना धनंजय मुंडेंना निवेदन...



कृषी मंत्र्यांची डॉ लोढा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट :- ना धनंजय मुंडे वणीत

वणी :- राजु गव्हाणे


    महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नामदार धंनजय मुंडे यांचे वणीला डॉ महेंद्रजी लोढा यांचे निवासस्थानी आगमनानिमित्य त्यांचे वणी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे स्वागत करून शेतकऱ्यांच्या बाबतीत निवेदन देण्यात आले. 

    यावेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या चे निवेदन देण्यात आले, त्यात सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा,पुरबुडी ,ओल्या दुष्काळा मुळे नष्ट झालेल्या पिकाची नुकसानभरपाई मिळण्यात यावी, दिवसाला रोज 10 तास वीज मिळण्यात यावी, कापसाला 12 हजार रु प्रति क्विंटल, सोयाबीन ला 8 हजार, तुरीला 13 हजार रु आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव देण्यात यावा, जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता तारकुंपणाला सरसकट अनुदान देण्यात यावे असे  निवेदन देण्यात आले, सदर निवेदन डॉ महेंद्रजी लोढा यांचे नेतृत्वात जेष्ठ नेते जयशिंग पा गोहोकार,  वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे, व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष तथा काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष राकेशजी खुराणा, वसंत जिनिग चे उपाध्यक्ष जय भाऊ आबड, अशोकजी पांडे, अफसर शेख तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

Post a Comment

0 Comments