ADvt

हलाकीची परिस्थिती त्यावर केली मात...परंतु काळाने केला त्या युवकाचा घात....
सचिनचे स्वप्न राहिले अधुरेच :- वन रक्षक भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू....

वणी :- सुरज चाटे

     शासकीय सेवेत आपला मुलगा राहावा हे प्रत्येक आई वडिलांची ईच्छा असतेच, मग मुलगा सुद्धा परिस्थितीची जाणीव ठेवत आपल्या तयारीला लागतो मात्र काळाला काही वेगळेच मंजूर होते. नागपूर येथील मैदानावर वनरक्षक पदाच्या भरतीसाठी गेलेल्या वणी तालुक्यातील २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दिनांक 4 मार्च 2024 ला घडली आहे. सदर तरुणाला एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

     It is the desire of every parent that their son should be in government service, then the son also starts his preparation keeping in mind the situation but time approves something different. The shocking incident of the death of a 28-year-old youth from Vani taluka, who had gone for recruitment to the post of forest guard, took place on March 4, 2024. The young man was admitted to the AIIMS hospital where doctors declared him brought dead.

     वणी तालुक्यातील पेटूर गावाचा सुपुत्र सचिन दिलीप लांबट हा तरुण वनविभागाच्या वनरक्षक पदाच्या भरतीसाठी तयारी करीत होता. तो वणीच्या शासकीय मैदानात सरावासाठी नियमित येत होता. घरची परिस्थिती हलाखीची मात्र आत्मविश्वास कायम. सचिन हा सामान्य कुटुंबातील तरुण होता. हलाखीच्या परिस्थितीत जगून त्याने शासकीय सेवेत दाखल होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. त्यामुळे परिस्थितीवर मात करून ४ मार्च मंगळवारला सचिन भरतीसाठी नागपुरात दाखल झाला. वनरक्षक भरतीची शारीरिक क्षमता चाचणी पाच किलोमीटर अंतर पार करत असताना अवघ्या १० ते १५ मीटर अंतरावर सचिन अचानक पडला. त्याची प्रकृती गंभीर झाली. त्याला वनविभागाच्या चमूने नागपुरातील एम्स रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सचिन ला मृत घोषित केले.
     या घटनेने सर्वत्र एकच धसका बसला असुन होतकरू युवक जगाच्या पडद्या आड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सचिन च्या पार्थिवावर दिनांक 5 मार्च ला सायंकाळी 5 वाजताच्या दरम्यान पेटूर येथील मोक्षधाम येथे अंत्यविधी करण्यात आला. सचिनच्या मागे आई वडील, भाऊ व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

दुसऱ्यांदा शारिरीक चाचणीची प्रक्रीया...
     दिनांक 21 व 22 फेब्रुवारीला नागपूर येथे शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. मात्र शारीरिक चाचणी घेते वेळी बिघाड आल्याने वन विभागाने पात्र उमेदवारांना दि 4 मार्चला पुन्हा शारीरिक चाचणी साठी बोलाविले होते. 

मुलाकडे निघालेल्या....आई वडीलांच्या गाडीचा रस्त्यात अपघात...
     मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच वातावरण बिघडले मग आई वडील व काही मंडळी चारचाकी वाहनाने नागपूरच्या दिशेने रवाना झाले. मात्र जाम ते बुटीबोरी रस्त्यावर त्यांच्या वाहनाला सुद्धा अपघात झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीचे मोठे नुकसान आले आहे. 

Post a Comment

0 Comments