ADvt

किरण देरकर यांना भारतीय नारी रत्न पुरस्कार प्रदान....
विधवा महिलांना सक्षम करणे व विविध समजुपयोगी उपक्रमांची दिली पावतती..

पुणे येथे ग्लोबल फाऊंडेशन कडुन मिळाला सन्मान..

वणी :- सुरज चाटे

      देशातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लोकांची दखल ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशन घेत असते. विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना गौरविण्यात येते. यावर्षी सुद्धा पुणे येथे ग्लोबल फाऊंडेशन ने विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यात सौ किरण संजय देरकर यांना नारी रत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. 

     Global Scholars Foundation takes notice of people working in various fields of the country. He is honored to encourage those working in various fields. This year also in Pune, Global Foundation has awarded awards to those working in various fields. Mrs. Kiran Sanjay Derkar has been honored with the Nari Ratna Award.

     वणी विधानसभा क्षेत्राचे प्रसिद्ध नेतृत्व असलेले यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष संजय भाऊ देरकर यांची पत्नी एकविरा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा तथा सन्मान स्त्री शक्तीचा महिला फाऊंडेशन च्या संस्थापकीय अध्यक्षा सौ किरणताई संजय देरकर यांनी गोर गरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करीत तसेच गोरगरीब विधवा महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना शिलाई मशिन भेट देत विविध आगळे वेगळे उपक्रम राबविले अशा अनेक राबविलेल्या त्याची दखल घेत पुणे येथील ग्लोबल स्कॉलर फाऊंडेशन ने याची दखल घेत  त्यांना भारतीय नारीरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे. 
       महिलांना एक वेगळी संकल्पना देत समाजुपयोगी निर्णय घेत किरणताई देरकर ह्या समाजुपयोगी व जनसेवेच्या विविध कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असतात. एकविरा महिला पतसंस्था तथा कुणबी समाज विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा सन्मान स्त्री शक्तीचा महिला फाऊंडेशन च्या संस्थापकीय अध्यक्षा सौ किरणताई संजय देरकर यांनी विधवा गोरगरीब व निराधार महिलांना शिलाई मशिन्स चे तर गरजु विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले होते.
      विधवा व होतकरू महिलांसाठी नेहमी अग्रेसर असलेल्या सन्मान स्रि शक्ति फाउंडेशन च्या संस्थापिका किरण ताई संजय देरकर गेल्या अनेक वर्षांपासून वणी झरी मारेगाव या तिनही तालुक्यात वाण आरोग्याचे व स्त्रियांच्या सन्मानाचे कोण जिंकेल पैठणी  या कार्यक्रमाच्या माध्यमातून सन्मानीय विधवा महिलांना हळदी कुंकू लावून सन्मानित केले व समाजातील स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी त्या अहोरात्र मेहनत घेतात या कार्याची दखल घेत त्यांना कार्याची पावती म्हणुन पुणे येथे ग्लोबल स्कालर फाउंडेशन तर्फे भारतीय नारी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. 

Post a Comment

0 Comments