ADvt

भिषण अपघातात वणीचे प्रसिद्ध जयंता उर्फ खुशाल कातोरे यांचे अपघाती निधन....आईची तब्येत पाहण्यासाठी वरोऱ्याला गेले अन.....

वणी :- सुरज चाटे

     दिवसागणिक अपघाताच्या मालिका जोर धरत असुन, वरोरा-वणी मार्गावरील वरोरा येथे आईला पाहण्यासाठी गेलेल्या वणीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे यांचा वरोऱ्याहून निघत असताना गणपती मंदिर जवळ अपघातात दुःखद निधन झाल्याची घटना सोमवार दि 22 एप्रिल 2024 ला सायंकाळी 7.25 वाजताचे सुमारास घडली आहे. जयंता उर्फ खुशाल महादेवराव कातोरे (57) असे अपघातात निधन झालेल्या इसमाचे नाव आहे. 

     As the series of accidents continues day by day, the tragic death of a famous personality of Vani who went to Varora on Varora-Vani road to see his mother, while leaving Varora, took place in an accident near Ganapati Temple on Monday 22nd April 2024 at around 7.25 pm. The name of Isma who died in the accident is Jayanta alias Khushal Mahadevrao Katore (57).

       वणीतील प्रसिद्ध सर्वांशी सुमधुर संवाद साधणारे हसत मुख नेतृत्व असणारे एका खाजगी कामावर आपले कर्तव्यदक्ष समजल्या जाणारे जयंता उर्फ खुशाल महादेवराव कातोरे (57) व त्यांची पत्नी, दोघेही रा वणी, हे दोघेही खुशाल यांच्या आईची तब्बेत बरी नसल्याने त्यांना पहावयास वरोरा येथे गेले होते. दरम्यान दिवसभर आई सह तब्बेतीची काळजी घेऊन बोलचाल करून सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास वरोऱ्याहून वणीच्या दिशेने निघाले असता गणपती मंदीर, वरोरा-वणी बायपास जवळ त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने धडक दिली त्यात ते गंभीर झाले आन घटनास्थळीच जयंता उर्फ खुशाल कातोरे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर त्यांची पत्नी जखमी असल्याची माहिती आहे. 
      एका बसने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याचे सांगण्यात येत असुन त्यांच्या अशा अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी व बराचमोठा आप्त परिवार असुन पुढील तपास पोलीस करीत आहे.

Post a Comment

0 Comments