ADvt

वणी पब्लिक स्कूल चा 100 टक्के निकाल ...



उज्वल यशाची परंपरा कायम :- पैकी च्या पैकी विद्यार्थी उत्तीर्ण...

वणी :-  सुरज चाटे

     छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित वणी पब्लिक स्कूलने दहावीच्या परीक्षेत 100% निकाल लागला असुन उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. या वर्षीही दहावी स्टेट बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे 
     दिनांक 27 मे रोजी महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा निकाल जाहीर झाला. या परीक्षेत कु. आर्या सचिन मत्ते 94.40 गुण मिळवत शाळेतून प्रथम क्रमांक व तालुक्यातून तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच  कु. हर्षदा राजू आवारी हिने 93.80 गुण प्राप्त करून शाळेतून 2 रा तसेच गुंजन सुनील बोबडे 92.40 गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे. शाळेतील एकूण विद्यार्थी पैकी 36 विद्यार्थ्यां विशेष प्रविण्यात यशस्वी झालेत. संस्थेचे सचिव ओमप्रकाश चचडा, निलेश चचडा, विक्रांत चचडा व प्राचार्य राजुरकर मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले व त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments