आई - वडिलाचा खडतर प्रवास.. मात्र जिद्द - मेहनतीने यश पदरी पाडल.....
अन् मुलाने संधीच सोन करून दाखवलं... सिद्धांत डगावकरच अभूतपूर्व यश....
एकेकाळी पिछाडीवर असलेला सिद्धांत चक्क अव्वल....
सिद्धांत डगावकर आर्य भट्ट पुरस्काराचा मानकरी.......
वणी पब्लिक स्कूल वणी चा 100% निकालाची परंपरा कायम....
वणी :- सुरज चाटे
जाहीर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10 वी मध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही वणी पब्लिक स्कूल वणी या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. शाळेतून सिद्धार्थ जितेंद्र डगावकर 92% गुण घेत विद्यालयात प्रथम आला. तर श्लोक उमेश निखार याने 90.40 गुण प्राप्त करून विद्यालयातून दुसरा तर ख़ुशी मंगेश बोढाले 88.80 गुण घेत तिसरी व नयन प्रवीण येलपुलवार 88.20 गुण प्राप्त करून विद्यालयात चवथा आला आहे.
जिद्द मेहनत हे काय असते हे यश मिळाल्यानंतरच समजते त्यामुळे कोणतेही काम हे कमी नसतेच. एकेकाळी वडील मिस्त्री काम करायचे. काम करता करता सोबतच शिक्षणाची आवड आन... समजुदार पणा... प्रवास मात्र त्या दोघांचाही खडतर... ते म्हणजे सिद्धांत चे आई-वडील सौ सुप्रिया व श्री जितेंद्र शिवराम डगावकर यांनी मात्र जिद्द - मेहनतीने यश आपल्या पदरी पाडल आणि त्याच यशातील संधीच सोन मुलाने व मुलीने करून दाखवलं. सिद्धांत हा एकेकाळी वर्गात पिछाडी वर असायचा मात्र कोण केव्हा कसा बुद्धिमान बनतो... हे यशानंतर कळते. जितेंद्र डगावकर यांची मुलगी रशिया येथे एम बी बी एस चे शिक्षण घेत आहे.
What is the meaning of hard work, one understands only after achieving success, so no work is less. Once upon a time, my father used to work as a mason. While working, he also had a passion for education... a sense of understanding... but the journey was tough for both of them... That is, Siddhant's parents, Mrs. Supriya and Mr. Jitendra Shivram Dagaonkar, achieved success through hard work and the opportunity of that success was shown to their son and daughter. Siddhant used to be behind in the class at one time, but who becomes intelligent when and how... this is known after success. Jitendra Dagaonkar's daughter is studying MBBS in Russia.
वणी पब्लिक येथील 39 विद्यार्थ्यांन पैकी 21 विध्यार्थी विशेष प्रविण्य श्रेणित व 17 विद्यार्थी प्रथम श्रेणित उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचे प्राचार्य. श्री राकेश कुमार देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यालयाचे शिक्षक सतीश बविस्कर, सय्यद इम्रान, अनुपली खोब्रागडे, चंदा बोरकर, मंगल तेलंग, सय्यद गौस व शाळेतील सर्व शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केले. या मध्ये स्वाईल ऑफ स्वाड मुंबई तर्फे दिल्या जाणारा विज्ञान विषयात विशेष गुण प्राप्त करणारा विध्यार्थी कु. ख़ुशी मंगेश बोढाले ही कल्पना चावला मेमोरियल अवोर्ड ची मानकरी ठरली. तर सिद्धांत जितेंद्र डगावकर याला गणित विषयात सर्वाधिक गुण प्राप्त झाल्या बद्दल दिला जाणारा स्व. हंसराजजी चचडा मेमोरियल तर्फे दिला जाणारा आर्य भट्ट पुरस्काराचा मानकरी ठरला.
यशस्वी विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आई वडील, विद्यालयाचे प्राचार्य राकेश कुमार देशपांडे संस्था चे सचिव ओमप्रकाशजी चचडा, विक्रांत जी चचडा व शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांना देत आहे यशस्वी विध्यार्थीला विद्यालयाचे प्राचार्य, व्यवस्थापन मंडळ व शिक्षक वृंदानी पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
0 Comments