धर्मा काकडे प्रभाग क्र. १३ मध्ये भगवा फडकविणार?....
संभाव्य उमेदवारांच्या यादीत अग्रगण्य नाव..
वणी : सुरज चाटे
नगरपरिषद निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने वाहू लागले असून, वणी शहरात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. रंगनाथ नगर, शास्त्री नगर परिसरात प्रभाग क्रमांक १३ मध्ये सध्या एका मजबूत व जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या व्यक्तिमत्वाची जोरदार चर्चा सुरू आहे.
Political activities have gained momentum in Wani city. In Ward No. 13 of Rangnath Nagar, Shastri Nagar area, there is currently a strong discussion about a personality who has made a place in the minds of the people.
प्रभाग क्र. १३ मध्ये धर्मा नामदेव काकडे यांचे नाव संभाव्य उमेदवारांच्या यादीत अग्रस्थानी असून, त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धर्मा काकडे हे माजी आमदार विश्वास भाऊ नांदेकर यांचे अत्यंत विश्वासू म्हणुन परिचित असुन शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे खंदे व एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. जनतेच्या अडचणी शासनदरबारी नेऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात ते नेहमीच तत्पर राहिले आहेत.
सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, वेळप्रसंगी जनतेच्या मागण्या खंबीरपणे मांडणारे धर्मा काकडे हे प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे व सामाजिक कार्यामुळे त्यांना चांगला जनाधार लाभला आहे.
यावेळी प्रभाग क्रमांक १३ मध्ये निवडणुकीची चुरस अधिक रंगणार असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात मिळत आहेत. स्थानिक नागरिकांना एक सक्षम, प्रामाणिक आणि जनतेचे हित जोपासणारा नगरसेवक हवा असल्याने, धर्मा काकडे यांच्या नावाभोवती उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी नगरपरिषद निवडणुकीत धर्मा काकडे हे बळकट, लोकप्रिय आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून उदयास येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
0 Comments