मनसे नेते राजु उंबरकर यांना मतृशोक....
श्रीमती सुनंदा उंबरकर यांचे निधन...
वणी :- सुरज चाटे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू उंबरकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा मधुकरराव उंबरकर यांचे गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुःखद निधन झाले. निधनाच्या वेळी त्या ८५ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या निधनाने उंबरकर कुटुंबावर तसेच वणी परिसरात शोककळा पसरली आहे. त्या सर्वांना आपुलकीने वागणाऱ्या आणि समाजसेवक वृत्तीच्या म्हणून ओळखल्या जात होत्या.
त्यांच्या मागे मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अंत्यसंस्कार शुक्रवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान वणी येथील मोक्षधाम येथे पार पडणार आहे.
संपूर्ण उंबरकर परिवाराला ईश्वर या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो.
0 Comments