खेमराज महाराज यांच्या 15 व्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन...
वणी :- सुरज चाटे
श्री संत खेमराज महाराज यांचा पंधरावा प्रकट दिन सोहळा दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी शुक्रवार, पिंपरी (कायर) येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
या निमित्ताने १६ ऑक्टोबर रोजी होमहवन व महारुद्राभिषेक, तसेच सुरपाम महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. १७ ऑक्टोबरला सकाळी ८.१६ वाजता शोभायात्रा व सद्गुरु जगन्नाथ बाबा पालखी सोहळ्याने कार्यक्रमास सुरुवात होईल. विविध गावांतील हरिपाठ मंडळे यात सहभागी होणार आहेत. रक्तदान शिबीर, शिवांशूजी महाराज (वृंदावन काशी) यांचे प्रवचन, तसेच घुगरी काला व महाप्रसादाचे आयोजन होईल. दुपारी १.१६ वाजता विश्वप्रसिद्ध बनारस काशीच्या भव्य गंगा आरतीचे दर्शन लाभणार आहे.
या आरतीसाठी काशीतील सहा पंडित विशेष येणार आहेत. संस्थानचे अध्यक्ष डॉ. गजानन पावडे यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments