प्रभाग १४ मध्ये राजु गव्हाणे संभाव्य उमेदवार म्हणुन चर्चा आघाडीवर.....
पैसोसे वोट खरीदे जाते है... लोग नहीं :- चांगल व्यक्तिमत्व जनतेनी देणे गरजेचे.. अन्यथा प्रभागाचा भकास अटळ....
वणी :- सुरज चाटे
निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने जोर धरू लागले आहे. वणी शहरातील राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला असुन स्थानिक स्तरावर उमेदवारांच्या चर्चांना रंग चढू लागला असताना, प्रभाग क्रमांक १४ मध्ये राजु देवराव गव्हाणे यांच्या नावाची चर्चा संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार आहे. सदर परिसर विकासा पासुन कोसो दुर असुन पाहिजे तसा विकास या प्रभागाचा झाला नसल्याने आता उमेदवार चांगला हवा.. अशीच चर्चा नागरिकांत असुन एक वेळा निवडून आला की साधा फिरूनही पहात नाही असा नगरसेवक नको रे बाबा.... असे काहीसे चित्र चर्चेत आहे.
While political activities in Wani city have gained momentum and discussions about candidates at the local level have started to gain momentum, the name of Raju Devrao Gavanhe is being discussed as a potential candidate in ward number 14. The area is far from development and the development of this ward has not been as desired, so now a good candidate is needed.. There is a similar discussion among the citizens and once elected, we don't want a corporator who doesn't even look around.... There is a certain picture in the discussion.
सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या आणि नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या, नव नवे समजुपयोगि उपक्रम घेत या प्रभागाला एक वेगळी ओळख निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून झटणारे राजु देवरावजी गव्हाणे हे प्राभग क्र. १४ चे संभाव्य नगरसेवक पदाचे उमेदवार म्हणून चर्चेत असुन मागील काळात त्यांनी नगरसेवक पदाच्या निवडणुकी लढवल्या, कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना, समाजिकतेतून जनतेच्या मनात विरोधकांना नेहमी बरोबरीची टक्कर ते देत राहिले.
रंगनाथ नगर प्रभाग क्रमांक १४ मध्ये जुडण्यासाठी येथे क्लिक करा...
Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/HpqshL7OZ9kH0esQZp9XMX?mode=ems_wa_t
राजु गव्हाणे यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा सौम्य स्वभाव, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि कार्यकुशलता यामुळे त्या प्रभागातील नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. स्थानिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेला पुढाकार आणि तरुण, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांच्या पाठिशी नागरिकांचा जनसमर्थनाचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रभाग क्रमांक १४ रंगनाथ नगर परिसरा मध्ये निवडणुकीची चुरस अधिक वाढणार असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत असुन खरंच या प्रभगाला चांगल्या नगरसेवकांचे ग्रहण लागले असुन एक जनतेचे हित जोपासणार व्यक्तिमत्व अजूनतरी या प्रभागाला लाभले नाही. त्यामुळे एक चांगल व्यक्तिमत्व जनतेनी देणे गरजेचे झाले आहे. नाही तर या प्रभागाचा भकास झाल्या शिवाय राहणार नाही हे अटळ आहेत.
आगामी नगरपरिषद निवडणुकीत राजु देवराव गव्हाणे या एक बळकट, लोकप्रिय आणि विश्वासार्ह चेहरा म्हणून उदयास येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
0 Comments