ADvt

रोटरी क्लब तर्फे शाळा क्रं . 7 मध्ये दंत रोग चिकित्सा शिबिर..



रोटरी क्लब तर्फे शाळा क्रं . 7 मध्ये दंत रोग चिकित्सा शिबिर..

वणी :– सुरज चाटे 

         रोटरी क्लब ऑफ ब्लैक डायमंड सिटी वणी तर्फे नगर परिषद शाळा क्रमांक 7 वणी मध्ये दिनांक 11 ऑक्टोबरला विद्यार्थ्यासाठी दंत रोग चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात शाळेतील 128 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. 
          A dental camp was organized for the students of Nagar Parishad School No. 7, Wani on October 11 by the Rotary Club of Black Diamond City, Wani. 128 students of the school were examined in this camp.
  या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कासावार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून रोटरी क्लब चे अध्यक्ष लवलेश लाल, सचिव गौरव जोबनपुत्रा,  डॉक्टर रेशम छूग़वानी, प्रकल्प संचालक शुभम मदान उपस्थित होते.
       या प्रसंगी  विद्यार्थ्यांना दातांची निगा कशी राखायची, कोणती काळजी घ्यायची. दातांसबंधी कोणते आजार होऊ शकतात. याचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी नियमित दोनदा दात स्वच्छ करणे. जीभ स्वच्छ करणे. इत्यादी बाबी सांगण्यात आल्या नंतर प्रत्येक विद्यार्थ्यांची तपासणी करून विद्यार्थ्यांना टूथ ब्रश व पेस्ट देण्यात आले. 
       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लबचे सदस्य व पदाधिकारी व विद्यालयातील शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments