प्रभाग ७ (अ) मध्ये नव्या समीकरणांची शक्यता...
सौ. राशी प्रवीण शर्मा यांचे नाव चर्चेत.....
वणी :- सुरज चाटे
नगरपरिषद निवडणुकीचे वारे आता अधिक वेगाने वाहू लागले असून, वणी शहरातील राजकीय हालचालींना नवाच वेग प्राप्त झाला आहे. स्थानिक स्तरावर उमेदवारांच्या चर्चांना रंग चढू लागला असताना, प्रभाग क्रमांक ७ (अ) मधून सौ. राशी प्रवीण शर्मा यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून जोरदार चर्चेत आहे.
सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या आणि नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या सौ. शर्मा यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा सौम्य स्वभाव, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि कार्यकुशलता यामुळे त्या प्रभागातील नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. स्थानिक प्रश्नांवर त्यांनी घेतलेली पुढाकार आणि लोकांशी असलेला थेट संवाद यामुळे त्यांच्या पाठिशी नागरिकांचा जनसमर्थनाचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
राजकीय वर्तुळातही त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून, प्रभाग क्रमांक ७ (अ) मध्ये निवडणुकीची चुरस अधिक वाढणार असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.
आगामी नगरपरिषद निवडणुकीत सौ. राशी प्रवीण शर्मा या एक बळकट, लोकप्रिय आणि विश्वासार्ह महिला चेहरा म्हणून उदयास येण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
0 Comments