ADvt

भाजपचा दमदार चेहरा विजय चोरडिया यांचा शिंदेसेनेत प्रवेश...



राजकिय खळबळ...

भाजपचा दमदार चेहरा विजय चोरडिया यांचा शिंदेसेनेत प्रवेश...

वणी :- सुरज चाटे 

    वणी तालुक्यातील राजकीय समीकरणाला नवी कलाटणी देणारी मोठी घडामोड उघडकीस आली आहे. विधानसभेतील भाजपचा मजबूत आणि प्रभावी चेहरा म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते विजय चोरडिया यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
    A major development has come to light that will give a new twist to the political equation in Wani taluka. Senior leader Vijay Chordia, known as the strong and influential face of BJP in the Legislative Assembly, has finally joined the Shiv Sena (Shinde faction) led by Deputy Chief Minister Eknath Shinde.
 मुंबईत पार पडलेल्या या भव्य प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री संजय राठोड, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत विजय चोरडिया यांनी अधिकृतरित्या शिंदे सेनेचा झेंडा हातात घेतला.
   चोरडिया यांच्या प्रवेशाने वणी तालुक्यातील स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गावपुढाऱ्यांपासून मतदारांपर्यंत नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली असून, भाजपला मोठा राजकीय धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
     तालुक्यातील नेतृत्वाचे समीकरण आपल्या बाजूने वळवले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या या हालचालीमुळे वणीतील राजकीय वातावरण तापले असून, “आता काहीतरी मोठा फेरबदल घडणार” अशी खमंग चर्चा जनमानसात रंगू लागली आहे.

Post a Comment

0 Comments