वडिलांकडून राजकारणाचे धडे घेणारा ‘साकेत’ आता मैदानी रणात उतरण्यास सज्ज....
पार्श्वभूमी मजबूत, विचार प्रखर आणि जिद्द अपार…!
वणी :- सुरज चाटे
राजकारणातील परंपरा जपत तरुणाईतून नवा नेता घडत असल्याची चर्चा सध्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये चांगलीच रंगली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे महत्वाचे पदाधिकारी म्हणून स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केलेले अविनाश भुजबळराव यांचा मुलगा साकेत अविनाश भुजबळराव आता राजकारणाच्या पटांगणात उतरण्याच्या तयारीत आहे.
सामाजिक कार्याची परंपरा घरातूनच अंगीकारलेला साकेत हा अतिशय कमी वयातील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे. तरुणांच्या समस्यांपासून ते बदलत्या राजकीय पिढीपर्यंत, नव्या दृष्टीकोनातून काम करण्याची तयारी त्याने केली असल्याचीही चर्चा आहे.
🎯 “तरुणाईला संधी मिळाली तर बदल निश्चित” – असा विश्वास साकेत व्यक्त करतो.
🏛️ प्रभाग क्रमांक ११ मध्ये त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू असून स्थानिक तरुणांमध्ये त्याबद्दल उत्सुकता वाढली आहे.
📌 पार्श्वभूमी मजबूत, विचार प्रखर आणि जिद्द अपार…!
सामाजिक बांधिलकी असलेल्या कुटुंबातून आलेला साकेत, राजकारणात ताज्या विचारांची आणि विकासाभिमुख नेतृत्वाची नवी ओळख निर्माण करेल का? — हा प्रश्न आता सर्वत्र चर्चेत आहे.
👉 प्रभाग ११ मधील राजकीय समीकरणे काय बदलतील?
👉 तरुण उमेदवाराची धडाकेबाज एन्ट्री कितपत प्रभाव पाडेल?
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!








0 Comments